माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी पंढरपूर येथे विठुरायाला अभिषेक
श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याना मंत्रिमंडळात किंवा वरिष्ठ लेवलवर स्थान मिळावे म्हणून आर्य वैश कोमटी समाज पंढरपूर येथील सर्व आर्य वैश्य समाजाच्या वतीने श्री विठूरायाचरणी अभिषेक करून साकडे घातले. तसेच नागपूर येथे आर्य वैश्य महाराष्ट्र महासभेच्या वतीने सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची महाराष्ट्र आर्य भविष्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार व नागपूरचे अध्यक्ष दीपक निलावार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात यावे यासाठी राज्यातून सर्व आर्य वैश्य समाज एकत्रित होऊन सुधीर भाऊंना पाठिंबा देण्यात आला व वरिष्ठ नेत्यांना ईमेल करून सुधीर भाऊंना मंत्रिमंडळात घेण्यात यावे यासाठी सर्व समाज बांधव एकत्रित झाले आहे.
प्रतिनिधी किरण मुक्कावार