सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री सचिवालयात साकारतेय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ महारांगोळी*

नागपूर, दि. 14* : राज्य शासनाची महत्वाकांक्षी महिला सक्षमीकरणाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत महारांगोळी येथील सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारली जात आहे. विधान भवनाच्या पोर्चमध्येही याचीच एक प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

Rohit Patil
  • Dec 15 2024 12:10PM
*मुख्यमंत्री सचिवालयात साकारतेय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ महारांगोळी*
 
*12 X 24 फुट आकार आणि 60 किलो रांगोळी पासून निर्मिती*
 
*नागपूर, दि. 14* : राज्य शासनाची महत्वाकांक्षी महिला सक्षमीकरणाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत महारांगोळी येथील सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारली जात आहे. विधान भवनाच्या पोर्चमध्येही याचीच एक प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. 
 
      सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारण्यात आली आहेत. याच परिसरात मुख्यमंत्री कार्यालयाच्या मागील भागात 12 सेमी उंचीच्या डायसवर 12 X24 फुट आकाराची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर आधारीत रांगोळी साकारण्यात येत आहे. लाडक्या बहिणीची प्रातिनिधिक प्रतिकृती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या प्रतिकृती रेखाटण्यात येत असून खास शैलीतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही खास शब्द रचनाही रेखाटण्यात येत आहे.  
                
       सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी उपअभियंते आणि गेल्या 45 वर्षांपासून रांगोळी कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सुनिल तरारे यांच्या नेतृत्वात नागपूर व यवतमाळ येथील एकूण पाच कलाकार ही महारांगोळी साकारत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सलग 13 तास हे कलाकार या रांगोळीचे आरेखन आणि रंगसंगतीचे कार्य करीत आहेत. 15 डिसेंबर पर्यंत ही रांगोळी तयार होणार आहे. याठिकाणी कार्यालयीन व परिसर स्वच्छतेत मग्न असणाऱ्या महिला कामगार कामातील उसंत मिळताच या रांगोळीची अवलोकन करुन कौतुक व सेल्फी घेत असल्याचे उत्साही चित्र दिसून येत आहे. या रांगोळीची अवलोकन व सेल्फी काढणे सोयीचे व्हावे यासाठी रांगोळी शेजारी दीड फुट उंचिचा डायस उभारण्यात आला आहे.  
 
      विधानभवनाच्या मुख्य पोर्च मध्येही हाच कालाकारांचा चमू 4 X 6 फुट आकारातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’वर आधारीत रांगोळी साकारणार आहे. 
               

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार