सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मालेगाव येथे ‘व्‍होट जिहाद’साठी बँक खात्‍यात ८०० कोटी रुपये हस्‍तांतरित; किरीट सोमय्यांकडून व्होट जिहाद प्रकरणाची पोलखोल

मालेगाव येथे व्होट जिहादच्या प्रकरणाची पोलखोल करत याप्रकरणात लक्ष घातले. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी X ट्विटरवर याप्रकरणाची माहिती शेअर केली आहे.

Sudarshan MH
  • Dec 2 2024 10:22AM

मालेगाव: भाजप नेते किरीट सोमय्यायांनी व्होट जिहाद करत काही मुस्लिमांच्या बँक खात्यात ८०० कोटी रूपये हस्तांतरित केले जात असल्याची माहिती दिली आहे. मालेगाव येथे व्होट जिहादच्या प्रकरणाची पोलखोल करत याप्रकरणात लक्ष घातले. त्यांनी X ट्विटरवर याप्रकरणाची माहिती शेअर केली आहे. यात २१ बँक खात्‍यांचा समावेश आहे. याप्रकरणात सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद, मामू, मोईन खान इस्माईल खान, सलमान शकील मिर्झा, नफिसा बाई, मोहम्मद साजिद आणि तर काही कट्टरपंथींसह दुबई येथे ५ व्यवसायिक कंपन्यांचा सहभाग असल्याची पोलखोल किरीट सोमय्या यांनी केली आहे.

मालेगावमध्‍ये २५० कोटी रुपरांचा बेहिशोबी आर्थिक व्‍यवहार झाला असून त्‍यांतील १२० कोटी रुपये निवडणुकीमध्‍ये ‘व्‍होट जिहाद’साठी वापरण्‍यात आले आहेत, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्‍या यांनी निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर नोव्‍हेंबरमध्‍ये केला होता. या वेळी त्‍यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणीही केली होती. काही मुसलमानांनी सहकारी बँकेच्‍या शाखेत अनुमाने २४ बँक खाती उघडली. त्‍यांत जमा झालेले पैसे वेगवेगळ्‍या ठिकाणच्‍या ३७ बँक खात्‍यांमध्‍ये पाठवण्‍यात आले. तेथून हा पैसा काढण्‍यात आला. या २५० कोटी रुपयांच्‍या आर्थिक व्‍यवहारातील १२० कोटी रुपये ‘व्‍होट जिहाद’साठी वापरण्‍यात आले, असा आरोप सोमय्‍या यांनी त्‍या वेळ केला होता.

दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रामाणात मुस्लिम मतांच्या माध्यमातून व्होट जिहाद करत त्यांना फायदा झाला असल्याचे त्यांनी याआधी वक्तव्य केले. तसेच त्यांनी सज्जाद नोमानी यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा फायदा झाला असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित ट्विट करत पुन्हा एकदा व्होट जिहादचे प्रकरण उघडकीस आणले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार