प्रचाराच्या परवानग्या मिळविण्यासाठी ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲप अधिक सुलभ जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी
नंदुरबार, दिनांक १० नोव्हेंबर २०२४ प्रचाराशी संबंधित परवानग्यांचा अर्ज सुलभतेने भरण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार आता नवीन आणि अपग्रेड (अद्ययावत) केलेल्या सुविधा 2.0 मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करू शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली आहे.