गोव्यात अमित शहांच्या प्रचार तोफेने विरोधक गारद
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना मोठ्या मंत्र्यांची केंद्रात वेळ घ्यायला अपॉइंटमेंट साठी वाट पहावी लागली नाही. असेही अमित शाह यावेळी म्हणाले गोव्याच्या मायनिंग संदर्भात डॉ. प्रमोद सावंत प्रश्न घेऊन दिल्लीत येत आहेत आपले सरकार आल तर नक्कीच आपण त्यावर काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले. गोव्याचा विकास भाजप करेल, पहिलेही भाजपने गोव्याचा विकास केला, मी इथे सगळा हिशोब घेऊन आलो आहे, असे म्हणत अमित शाह यांनी गोव्यात केलेले काम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.