देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हावी. -- प्रवक्ते अतुल लोंढे
फोन टँपिंग प्रकरण चांगलेच गाजले असताना, या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज नागपूर शहरात पत्रपरिषदेत केली.