शिक्षक पदवीधर मध्ये भाजपला दणका तर महा विकास आघाडी आघाडी वर... जाणून घ्या सध्या स्थिती
नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर 1 लक्ष 33 हजार 53 मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा 60 हजार 747चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजित गोविंदराव वंजारी एकूण मते 55 हजार 947, संदीप जोशी एकूण मते 41 हजार 540 , अतुल कुमार खोब्रागडे 8 हजार 499 , नितेश कराळे 6 हजार 889 मते मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक 2 सुरु करण्यात आला. त्यानुसार दुसऱ्या पसंतीक्रमाची मते बाद फेरीनुसार मोजणीला सुरुवात झाली आहे.