सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती संभाजीनगरच्या घोडेगावमध्ये रस्त्यासाठी रस्त्यावरती उतरले विद्यार्थी

घोडेगावच्या नागरिकांना प्रत्येक निवडणुकीच्या वेळी रस्त्याचे काम करून देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु ते फक्त आश्वासनच राहते.

Sudarshan MH
  • Oct 10 2024 12:04PM
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घोडेगावमध्ये जाण्यासाठी आजपर्यंत रस्ता बनलेला नाही आणि रस्त्याच्या अडचणीमुळे विद्यार्थी असो किंवा महिला किंवा पेशंट कोणालाही व्यवस्थित जाता येत नाही. प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये यांना रस्ता बनवून देण्याचे आश्वासन देण्यात येते पण आश्वासन फक्त आश्वासन राहते.
 
या सर्व बाबींना वैतागून घोडेगाव यथील विद्यार्थी असो महिला असो किंवा शेतकरी असो यांनी सर्वांनी मिळूनच आंदोलन केले व त्यांनी मागणी केली आहे, की सरकारचं लक्ष नसल्यामुळे आमचे हे हाल होत आहे. कुणी पेशंटला जर दवाखान्यात घेऊन जायचं असेल तर बैलगाडीमध्ये घालून घेऊन जावं लागतं . मुलांना शाळेमध्ये चिखलातून गेल्यामुळे शिक्षक चिडतात शेतकऱ्यांना अन्न विक्रीसाठी घेऊन जाण्यास अडचण निर्माण होतात पण घोडेगाव वर खासदार असो किंवा आमदार कोणाचे लक्ष नाही फक्त निवडणुकीचे मत त्यांचे लक्ष असतं त्यानंतर काहीही घेणं देणं नसते तरी सरकार कडून तात्काळ रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी घोडेगावच्या नागरिकांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार