लष्करी शक्तीच्या आधारे जगभरातील देशांची क्रमवारी ग्लोबर फायरपॉवर या संस्थने जाहीर केली आहे. GFP इंडेक्स २०२५ मध्ये भारताने चौथे स्थान मिळवले आहे. भारताने मिळवलेल्या या मानांकनामुळे तो आता एक बलशाली लष्करी शक्ती म्हणून उभा राहिला आहे. गेल्यावर्षी भारताचे स्थान नवव्या क्रमांकावर होते. भारताने आता पाच स्थानांची झेप घेतली आहे. त्याऊलट भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानचा क्रमांक घसरला असून, पाकिस्तान बाराव्या स्थानावर पोहोचला आहे.
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५ च्या यादीनुसार, अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनी भारतापेक्षा उच्च स्थान मिळवले आहे. हे देश पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. भारताचा पॉवर इंडेक्स स्कोअर 0.1184 असून, तो चौथ्या स्थानावर आहे. यामुळे भारताची लष्करी क्षमता, आधुनिक शस्त्रे, आणि भौगोलिक स्थिती तसेच जागतिक प्रभाव मजबूत होऊ शकतो.
भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांची एकत्रित सामर्थ्य भारताला चौथ्या स्थानावर पोहोचवते. भारतीय सैन्य १४.५५ लाख सक्रिय सैनिकांसह एक अद्वितीय सामर्थ्य आहे. त्याचबरोबर, भारतीय हवाई दलाकडे २,२२९ विमाने आहेत, ज्यामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरांचा समावेश आहे. भारतीय नौदलामध्ये आण्विक पाणबुड्या आणि विमानवाहू युद्धनौका आहेत, जे भारताच्या सागरी सामर्थ्याला पुन्हा एकदा अधोरेखित करतात. भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी लढाईची तयारी आणि आधुनिक शस्त्रास्त्रांसह सतत अद्ययावत केल्याने भारताच्या लष्करी क्षमतेत वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलातील राफेल आणि सुखोई - ३० एमकेआय लढाऊ विमाने, तसेच ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची प्रणाली भारताच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करतात.