सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वेरूळ येथे जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमा मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न।

उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात संपन्न

Deepak Chavhan
  • Jul 3 2023 11:18PM

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरूळ नगरीमध्ये आज निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी)महाराज व त्यांचे 
उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या पावन सानिध्या 
मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून गुरुपौर्णिमे च्या ह्या पावन पर्वावर वेरूळ आश्रमामध्ये पहाटेच्या सत्रा मध्ये  नित्यनेम विधी आरती व प्रवचन व अनुष्ठानाला बसलेले बालगोपालाच्या अनुष्ठानाची सागता महामंडलेश्वर स्वामीशांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये मोनव्रत सोडून करण्यात आली

त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखीची चांदीच्या रथा मध्ये वेरूळ नगरीमध्ये भव्य मिरवणुक करण्यात आली व गुरु पूजनाचा कार्यक्रम ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषामध्ये महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज,स्वामी सेवागिरीजी महाराज,स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते जगद्गुरु जनार्दन स्वामीच्या चरण पादुकांचे पाद्यपुजन करण्यात आले।याप्रसंगी महाश्रमदान सोहळ्यानिमित्त ५०० ठिकाणाहुन गुरुभक्तांनी आणलेल्या तीर्थाद्वारे

महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांना स्नान घालण्यात आले.व महाराजांचे पाद्यपूजन करून जय बाबाजी भक्तपरिवारातर्फे यावेळी पुजनीय बाबाजींची विधी च्या पुस्तकांनी तुला करण्यात आली.या वेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती कडून श्री बाबाजींना आंतरराष्ट्रीय समाज भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या गुरुपूर्णिमा सोहळ्याला आश्रमीय संत स्वामी सेवागिरीजी महाराज,स्वामी लक्ष्मणगिरीजी, स्वामी परमेश्वरानंदगिरी महाराज, स्वामी कमलानंदगिरी महाराज, स्वामी हरिहरनंदगिरी महाराज, ब्रह्मचारी रामानंद महाराज,ब्रह्मचारी नागेश्वरानंद महाराज,संतवृंदासह ब्राह्मणवृद्ध व आश्रमाचे विश्वस्त विविध जिल्ह्यांतील जय बाबाजी भक्त परिवाराची जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष व गुरुकुल चे विद्यार्थी व हजारो जय बाबाजी भक्त परिवार यावेळी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार