अयोध्या: माझ्या तीन पिढ्या श्रीरामजन्मभूमी चळवळीला समर्पित होत्या. आम्ही सत्तेसाठी आलो नाही. श्रीराममंदिरासाठी आपल्याला सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते अयोध्येतील विकास कामांनिमित्त येथे पोचले होते. त्या वेळी एका कार्यक्रमात त्यांनी वरील विधान केले.
यावेळी बोलतांना योगी आदित्यनाथ म्हणाले, की एक गट असा होता, की ‘मुख्यमंत्री म्हणून अयोध्येत गेल्याने वाद निर्माण होईल’, असे म्हणायचा. आम्ही म्हणालो की, ‘जर वाद निर्माण झाला, तर होऊ द्या; पण अयोध्येबद्दल काहीतरी विचार करण्याची आवश्यकता आहे.’ एक गट असाही होता, जो म्हणाला की, ‘तुम्ही जाल आणि मग राममंदिराची चर्चा होईल.’ मी म्हणालो की, ‘आम्ही सत्तेसाठी आलो आहोत’, असे कुणी म्हटले, तर श्रीराममंदिरासाठी सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नसावी.
जेव्हा आम्ही वर्ष २०१७ मध्ये अयोध्येत दीपोत्सवाचे आयोजन केले होते, तेव्हा आमच्या मनात एकच गोष्ट होती की, काहीही झाले, तरी अयोध्येला तिची ओळख मिळाली पाहिजे, अयोध्येला तिचा योग्य आदर मिळाला पाहिजे. दिवाळीच्या एक दिवस आधी, अयोध्येचा दीपोत्सव एक उत्सव बनला आहे, तो समाजाचा उत्सव बनला आहे, हे तुम्ही पहात असाल.
श्री अयोध्या धाम ही भारतातील सनातन धर्माची पायाभूत भूमी आहे आणि ७ पुण्यनगरींपैकी ती पहिली आहे. रामायण हे जगातील पहिले महाकाव्य बनले आणि सामान्य लोकांमध्ये इतके लोकप्रिय झाले की, ते भारतासह जगातील विविध भाषांमधील लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे.