सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बुलढाण्यात केस गळती नंतर आता नखं गळती! नागरिक हैराण; केंद्र सरकारकडून दखल

बुलढाणा जिल्ह्यात केस गळती झालेल्या रुग्णांची नखं गळती सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Sudarshan MH
  • Apr 21 2025 10:11AM

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला आता गंभीर वळण लागलं आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं गळती सुरु असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे.

केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली आहे. नखं गळून पडत आहे. आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या नखं गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या आकस्मित चिकित्सा राहत पथक बुलढाणा जिल्ह्यातील नखं गळती रुग्णांची तपासणी करण्यासाठी तात्काळ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी पीडित रुग्णांना या आजारपासून मुक्तता मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

पुढे आलेल्या माहितीनुसार, NCDC चे अतिरिक्त संचालक डॉ. तंझिन दिकिड यांच्या नेतृत्वात सरकारच्या आरोग्य विभागाच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला केस व नखं गळती भागाचा तात्काळ दौरा करण्याचा आदेश देण्यात आले आहे. हे पथक केस व नखं गळती भागाचा दौरा करून सरकारला उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे. सध्या शेगाव तालुक्यातील ७ गावांत जवळपास ८० रुग्णांचे नखं गळल्याची माहिती समोर आली आहे. केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने राज्याचे आरोग्य उपसंचालक आज दि. २१ एप्रिल रोजी या भागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार