सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दौंड शहरातील कत्तलखानाची परवानगी रद्द करण्याबद्दल हिंदू संघटनांकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

आमदार राहुल कुल हे कत्तलखाना होणारच ही हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत.

Patil
  • Dec 17 2023 12:44PM

दौंड: दौंड तालुक्यातील तसेच पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा व सोलापुर जिल्ह्यातील तमाम हिंदू धर्मियांची तीर्थक्षेत्र असलेल्या भीमा नदीलगत व चंद्रभागा नदीवर व श्री क्षेत्र सिद्धटेक गणपती च्या लगत दौंड चे भाजपा आमदार राहुल कुल यांनी २०१९ च्या भाजपा सरकारकडून सर्वात मोठा शासकीय यांत्रिक कत्तलखाना मंजूर करून आणला विशिष्ट समाजाच्या फायद्यासाठी हा कत्तलखाना बांधला जात आहे. या कत्तलखान्यास हिंदू धर्मियांचा तसेच जैन, शिख, बौद्ध व वारकरी संप्रदायचा कडाडून विरोध आहे.

सदर नवीन कत्तलखान्यात म्हशी कापल्या जातील सांगितले जात आहे. तरी या कत्तलखान्यात किंवा आसपास देशी गोवंशची हत्या व तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज पोलीस कारवाई करून गोवंश व गोमास पकडून तेथील कुरेशी वर गुन्हे दाखल आहेत. याआधी याच परिसरात देशी गोवंश हत्या व गोमांस तस्करी मोठ्या प्रमाणात झाली आली आहे, तशा कायदेशीर कारवाई झाल्या आहेत.

शासकीय नियमानुसार बारामतीत कत्तलखाना असताना जवळपास अंतरावर कत्तलखान्यास मंजुरी देता येत नाही, त्यामुळेच हा कत्तलखाना बेकायदेशीर पद्धतीने मंजूर करण्यात आला आहे. दौंड शहरात व आसपास राहण्या-या नागरिकांना त्यांची मते मागितली नाहीत व आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची मते किंवा हरकती मागितल्या नाहीत. पर्यावरणाच्या दुष्टीने हा कत्तलखाना घातक आहे. पंढरपूरला जाणारी चंद्रभागा नदी जवळ हा कत्तलखाना आहे. त्यामुळे त्यातील दूषित रक्ताचे पाणी नदीत सोडले जाणार आहे, त्यामुळे चंद्रभागेची विटंबना केली जाईल. वारकरी संप्रदायचा याला प्रखर विरोध आहे.

तसेच अष्टविनायक मधील श्री क्षेत्र सिद्धटेक गणपती येथून जवळ आहे. व त्याठिकाणी ची भीमा नदी ची विटंबना या कत्तलखान्यामुळे होणार आहे. कत्तलखाण्या पासून 60 फूट अंतरावर मारुतीचे मंदिर आहे त्यामुळे हिंदू समाजाचा याला कडाडून विरोध आहे .तमाम हिंदू समाज कत्तलखान्याच्या विरोधात असून सुद्धा दौंड सारखा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भुमित कत्तलखाना आणणे हा भाजपा आमदार राहुल कुल यांचा अट्टाहास कितपत योग्य आहे? असा प्रश्न यावेळी हिंदू समाजाने उपस्थित केला आहे.

आमदार राहुल कुल हे कत्तलखाना होणारच ही हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. महाराष्ट्र भाजपाने गोवंश हत्या बंदी कायदा महाराष्ट्रात केला. हे हिंदू धर्मावर व गोमातेचे रक्षण करण्यासाठी मोठे पाऊल उचलेले, त्याबद्दल अभिनंदन, पण याच सरकारने व आमदारांनी दौंड मध्ये कत्तलखाना मंजूर करणे हे योग्य नसून सकल हिंदू समाजाचा याला प्रखर विरोध आहे, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

सदरचा कत्तलखाना तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा हिंदू समाज याविरोधात मोठे जनआंदोलन उभे करून रस्तावर उतरेल. आपले हिंदुत्ववादी सरकार आहे, आणि महाराष्ट्रातील हिंदू समाजाच्या जण भावनेचा आदर करून आपण तात्काळ हा कत्तलखाना रद्द करावा. हिंदू समाज व हिंदू संघटना आपल्या सरकारच्या हिंदुत्ववादी भूमिकेची वाट पाहत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपण कत्तलखाना रद्द करून आधीचे हिंदू विरोधी कत्तलखाणे बांधणारे सरकार व आपले कत्तलखाणे पाडणारे, रद्द करणारे गोमातेचे रक्षण करणारे सरकार यातला फरक महाराष्ट्राला आपल्या निर्णयाने दाखवून दयावात, असे निवेदन हिंदू संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार