सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धाराशिवमधील ३ अल्पवयीन मुलींनी रचला बीटीएस पॉप बँडच्या सदस्यांना भेटण्यासाठी अपहरणाचा बनाव

दक्षिण कोरियाच्या लोकप्रिय पॉप बँड बीटीएसच्या सदस्यांना भेटण्यासाठी पैसे कमवता यावेत, यासाठी महाराष्ट्रातील तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःचे अपहरण केल्याचा बनाव केला.

Sudarshan MH
  • Dec 31 2024 2:43PM
धाराशिव: दक्षिण कोरियाच्या लोकप्रिय पॉप बँड बीटीएसच्या सदस्यांना भेटण्यासाठी पैसे कमवता यावेत, यासाठी धाराशिवमधील तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःचे अपहरण केल्याचा बनाव केला आहे. पोलिसांनी या मुलींची चौकशी केल्यानंतर मुलींनी अपहरणामागील त्यांचा खरा हेतू उघड केला. त्यांनी स्पष्ट केले, की त्यांनी काम शोधण्यासाठी आणि दक्षिण कोरियाच्या सहलीसाठी पैसे कमवण्यासाठी पुण्याला जाण्याची योजना आखली होती. जिथे त्यांना बीटीएस सदस्यांना भेटण्याची आशा होती.
 
२७ डिसेंबर रोजी एका व्यक्तीने धाराशिव पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल केला आणि दावा केला की जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तीन मुलींना स्कूल व्हॅनमध्ये जबरदस्तीने नेले गेले. पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि उमरगा येथून पुण्याला जाणाऱ्या राज्य परिवहन बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचा फोन नंबर असल्याचे आढळून आले. ही बस सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरातून जात असताना त्यांना सापडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
 
ते म्हणाले की, उमरगा पोलिसांनी त्यांच्या मोहोळ येथील सहकाऱ्यांसह बसस्थानकावर दुकान थाटणाऱ्या एका महिलेशीही संपर्क साधला. यानंतर महिलेच्या मदतीने तिन्ही मुलींना बसमधून उतरवून स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, नंतर उमरगा पोलिसांचे पथक अल्पवयीन मुलाच्या पालकांसह तेथे पोहोचले. या थक्क करणाऱ्या घटनेनंतर महाराष्ट्रातील पालकांमध्ये मुला - मुलींच्या सोशल मीडिया वापरासंदर्भात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार