सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बेकायदेशीररित्या राहणार्‍यांना पकडण्यासाठी पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू; ऑपेरेशन करता जवळपास ३० टीम सज्ज

कोंबिंग ऑपरेशन करता एकूण संशयास्पद तीस ठिकाणे ठरवण्यात आली असून तीस टीम तयार करण्यात आल्या आहेत.

Sudarshan MH
  • Jan 25 2025 11:23AM

मुंबई: मिरा - भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत परिमंडळ १ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यात एकाच वेळी गुरुवारी सायंकाळपासून कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. या ऑपेरेशन करता जवळपास ३० टीम तयार करण्यात आल्या आहेत. कोंबिंग ऑपरेशन करता एकूण संशयास्पद तीस ठिकाणे ठरवण्यात आली असून तीस टीम तयार करण्यात आल्या आहेत. या परिसरात गेल्यानंतर घराची झडती घेत त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड मागण्यात आले आहेत. तसेच काही जणांशी बंगाली भाषेत देखील संवाद साधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

संशयित वाटणार्‍या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना चौकशी करता पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले असून त्यांच्या कडे कायदेशीर कागदपत्र आढळून आली नाहीत, तर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. याच बरोबर या ऑपेरेशन करता एक विशेष फॉर्म तयार करण्यात आला असून त्यात संशयास्पद वाटणार्‍या सर्व नागरिकांची माहिती भरून घेतली जाणार असून त्याची नंतर पडताळणी केली जाणार आहे.

त्यात काही चुकीचे आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.याआधी मिरा भाईंदर शहरात काही दिवसांपूर्वीच आश्रया करता श्रीलंकेतून पळून आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले होते. अवैधपणे बिनापरवाना, पासपोर्ट, व्हिसाबिना राहणारे परकीय नागरिक, (बांगलादेशी, म्यानमार ) याव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाचे असतील याचा शोध या टीम घेणार आहेत. अवैध दारू, हत्यारे, यांचा देखील शोध घेतला जाणार आहे. शहरातील सर्व हॉटेल लॉज देखील तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

 

त्यात काही चुकीचे आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याआधी मिरा भाईंदर शहरात काही दिवसांपूर्वीच आश्रया करता श्रीलंकेतून पळून आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले होते. अवैधपणे बिनापरवाना, पासपोर्ट, व्हिसाबिना राहणारे परकीय नागरिक, (बांगलादेशी, म्यानमार) याव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाचे असतील याचा शोध या टीम घेणार आहेत. अवैध दारू, हत्यारे, यांचा देखील शोध घेतला जाणार आहे. शहरातील सर्व हॉटेल लॉज देखील तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ १ प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार