सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशात वाढणाऱ्या इस्लामिक जिहादी कट्टरपंथीयांच्या अतिरेकी घटनांविरोधात विश्व हिंदू परिषद शांत बसणार नाही.- शंकरजी गायकर,

सरकारकडून दोषींवर कठोर कारवाईची विश्व हिंदू परिषदेची मागणी

Deepak Chavhan
  • Jul 4 2022 9:35AM

मुंबई:- देशात वाढणाऱ्या इस्लामिक जिहादी कट्टरपंथीयांच्या अतिरेकी घटनांविरोधात विश्व हिंदू परिषद शांत बसणार  नाही. महराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांची दिनांक २१जून रोजी झालेली हत्या ही उदयपुर येथे झालेल्या कन्हैय्या कुमार यांच्या हत्येसारखीच आहे.परंतु ती हत्या वेगळी आहे असे भासविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासना कडून करण्यात आला.सत्य फार काळ लपून राहत.नाही.आता केंद्रीय तपासणी संस्था N.I.A.यांचेकडे ही तपासणी सुपूर्त करण्यात आली.विश्व हिंदू परिषद या सर्व गोष्टीकडे काळजीपूर्वक व बारकाईने लक्ष ठेऊन आहे.तसेच आक्रोषित वआक्रमक आहे.

 ह्या घटना केवळ राजस्थान व महाराष्ट्र या राज्यांपुरत्या मर्यादित नसून देशभरातील सर्व गावोगावी ही समस्या उभी राहिली आहे. यावर स्वतःला तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणवणारे आपल्या बिळात लपून बसले आहेत ते यावर चकार शब्दाही काढायला तयार नाहीत यावरून हे सिद्ध होते की हिंदूंचे खच्चीकरण हा एकमेव अजेंडा ते चालवत आहेत.व त्यांचा धर्मनिरपेक्षतेशी दुरान्वयेही संबंध नाही. ते केवळ ढोंगी आहेत. हे देशातील जनतेसमोर आता उघड झाले आहे . 

विश्व हिंदू परिषद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आपणास मिळालेल्या दायीत्वासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन करते. त्याचवेळेस आपले सरकार हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थापन झाले याकरिता आनंद व्यक्त करते. त्यासोबतच ही अपेक्षाही व्यक्त करते की यापुढे हिंदू हित व हिंदू समाजाची सुरक्षा यावर आपले सरकार भर देईल.हिंदू समाज हा आपला पराक्रम व पौरुषत्व विसरलेला नाही हे अधोरेखित करत असतांना त्याच्या संयमाची व 
धैर्याची परीक्षा शासन, प्रशासन,धर्मांध जिहादी यापैकी कुणीही घेऊ नये. 

हिंदू समाज आपले संरक्षण करणे जाणतो व प्रत्युत्तर देणेही जाणतो. ही खुनाची साखळी इथेच पूर्णतया थांबली नाही तर धर्मांध जिहादींना अक्रोषित जनतेच्या रोषामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी विश्व हिंदू परिषद चेतावणी देत आहे.या देशात संविधान आहे व हा देश भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावरच चालेल. या देशात शरिया कायदा मानून चालणारे आपले अस्तित्व संपवून बसतील व त्यांचे मनसुबे या देशात कधीही पूर्णत्वास जाणार नाही. याची काळजी व रक्षण संविधानावर विश्वास असणार सर्व देशभक्त समाज जागरूक राहून, संघर्ष करून व आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरून निश्चित करेल याची खात्री व विश्वास विश्व हिंदू परिषद व्यक्त करीत आहे. तसेच याचे नेतृत्व करण्यासही विश्व हिंदू परिषद पूर्ण ताकतीनिशी सज्ज व सतर्क आहे.

दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना देशातील सर्वोच्च असलेली फाशीची शिक्षा द्यावी याकरिता आवश्यक त्या सर्व प्रक्रिया जसे हा खटला जलदगती न्यायलयात चालवावा, या खटल्याकरीत हुशार व कार्यतत्पर सरकारी वकील द्यावा अश्या गोष्टी त्वरित पूर्ण करव्यात अशी मागणी विश्व हिंदू परिषद करीत आहे. व यापुढे अश्या घटना घडणार नाही याची कठोर उपाययोजना सरकारने त्वरित करावी आणि कायदा व सुव्यवस्थेचे राज्य प्रस्थापित करावे असे निवेदन करीत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार