सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री

Deepak Chavhan
  • Sep 18 2022 9:12PM
मुंबई,:राज्यातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनीआंदोलन केले होते. 

मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनकर्त्या तरुणांशी संवाद साधून थेट आझाद मैदानात त्यांची भेट घेतली. त्यांचे निवेदन स्वीकारले. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका असून त्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिली.यावेळी खासदार राहुल शेवाळे आणि राज्यभरातून आलेले अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार