राज्यात महिलांमधील कौशल्य विकासासाठी, पारंपारीक हस्तकला क्षेत्रातील अग्रणी रुमा देवी यांचे सहकार्य घेणार - मंत्री मंगलप्रभात लोढा
रुमा देवी यांनी घेतली मंत्री श्री. लोढा यांची सदिच्छा भेट
मुंबई, : पारंपारिक हस्तकला, वस्त्रोद्योग, हॅंडीक्राफ्ट्स, पारंपारिक कलाकुसरी आदींच्या माध्यमातून जवळपास ३० हजार महिलांच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रुमा देवी यांनी आज राज्याचे कौशल्य विकास आणि महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट घेतली. श्रीमती रुमा देवी यांचे ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणात फार मोठे योगदान असून त्यांच्या अनुभवाचा राज्यात उपयोग करून घेतला जाईल. महिला बचतगटांचे सक्षमीकरण, त्यांचा कौशल्य विकास यासाठी श्रीमती रुमा देवी यांच्यामार्फत विविध प्रशिक्षणे घेण्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले जाईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
मंत्रालयात आज ही सदिच्छा भेट झाली. मंत्री श्री लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीमती रुमा देवी यांचे स्वागत केले.
श्रीमती रुमा देवी या बारमेर जिल्हा, राजस्थान येथील असून अल्पशिक्षित आहेत. तरीही त्यांनी सुरुवातीला बचतगटांच्या माध्यमातून काही महिलांना सोबत घेऊन पारंपारिक हस्तकला, पारंपारिक वस्त्रोद्योग यांचा व्यवसाय सुरू केला. पुढील काळात या चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. आज श्रीमती रुमा देवी यांच्या चळवळीशी सुमारे 30 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत, ज्यांना आज शाश्वत रोजगार प्राप्त झाला आहे. श्रीमती रुमा देवी यांना जयपूर येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. त्याचबरोबर श्रीलंका, नेदरलँडस् या देशांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. हाॅरवर्ड विद्यापीठ येथे झालेल्या एका परिषदेला श्रीमती रुमा देवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. कौन बनेगा करोडपती, इंडियन आयडॉल आदी टीव्ही कार्यक्रमांत सहभागी होऊन त्या माध्यमातूनही श्रीमती रुमा देवी यांनी ग्रामीण महिलांच्या हस्त कलाकुसरींचा प्रसार केला.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, ग्रामीण, आदिवासी महिलांच्या विकासासाठी श्रीमती रूमा देवी यांनी केलेले कार्य अद्भुत असे आहे. या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्रातही उपयोग करून घेण्यात येईल. येथे विविध प्रकारची कौशल्य विकासविषयक प्रशिक्षणे आयोजित करणे, महिलांना मार्गदर्शन करणे यासाठी रूमा देवी यांचे सहकार्य घेण्यात येईल. लवकरच विभागामार्फत या संदर्भात निर्णय घेऊ, असे मंत्री. श्री लोढा यांनी सांगितले.
०००
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प