सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात व्यापार उद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी - केद्रीय मंत्री. नारायण राणे

राज्यातील उद्योग क्षेत्राला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणार - काँबिनेट मंत्री उदय सामंत

Deepak Chavhan
  • Sep 20 2022 6:23PM
मुंबई : महाराष्ट्र राज्य भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आलेले आहे. वैद्यकीय उत्पादन क्षेत्रात सर्वात पुढे आहे जीडीपी मध्ये पुढे आहे आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष देणे गरजेचे आहे.  आधुनिकरणामुळे उत्पादन वाढते, उत्पादन वाढले की नफा वाढत जातो. आधुनिकीकरण ही काळाची गरज असून स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे.  निर्यात वाढवा, आयात कमी करा असे केंद्रीय सूक्ष्म लघुउद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले. तसेच महाराष्ट्र चेंबरने राज्यामध्ये उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मदत करावी, बंद व आजारी उद्योग व्यवस्थित सुरू होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व शासनाची मदत मिळवून देण्यास सहकार्य करावे. सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडून महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना ना. नारायण राणे यांनी दिले. 


राज्यातील व्यापार उद्योग कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या कार्याचे कौतूक ना.  नारायण राणे यांनी याप्रसंगी केले. राज्यस्तरीय उद्योग परिषदेमध्ये मुख्य पाहुणे भारत सरकारचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नाम. नारायण राणे यांनी भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची प्रगती भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन या विषयावर मार्गदर्शन केले...


त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील उद्योगांना गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र चेंबर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उद्योजक वाढविण्याचे जे काम करते ते कौतुकास्पद आहे. व्यापार उद्योगाच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व सहकार्य व उद्योजकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील राज्यातील व्यापार उद्योजकांच्या अडचणी सोडविण्या साठी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ८ दिवसात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री सामंत यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना  दिले. मोठी गुंतवणूक वा मोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन  उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू  असल्याची माहिती उद्योग मंत्री सामंत यांनी दिली. 


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर तर्फे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत मेक इन महाराष्ट्र मध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर उद्योग मंत्री सामंत यांनी मार्गदर्शन केले. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनीही यावेळी विशेष मार्गदर्शन केले.केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या 94 व्या वार्षिक अहवालाचे अनावरण करण्यात आले. तसेच महिला उद्योजकता समितीचे धोरण व युथ विंग समिती व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ना. नारायण राणे व ना. उदय सामंत यांचा सत्कार केला व प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय उद्योग परिषदेची सविस्तर माहिती दिली तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यांमध्ये महिला समिती व युथ विंग आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग समिती यांच्यामार्फत महिला व तरुणांसाठी “ उद्योग वृद्धीयात्रा”  आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे राज्यातील 36 जिल्ह्यात महिला क्लस्टर, कृषी क्लस्टर व उत्पादन आधारित क्लस्टर ची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले. भारत अमेरिकेदरम्यान व्यापार उद्योग वाढीसाठी इंडो यूएस डेव्हलपमेंट फोरमची स्थापना महाराष्ट्र चेंबर तर्फे करण्यात आली असून परत अमेरिकेत गुळ व आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. व्यापार उद्योगांच्या विविध अडचणींची माहिती याप्रसंगी दिली व राज्यांमध्ये प्लास्टिक बंदी ला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

याप्रसंगी महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स च्या ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये श्री. चंद्रकांत ठक्कर यांना स्थायी सदस्य म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे औद्योगिक मंत्री उदय सामंत जी, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र माणगावे तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार