सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्राला समृद्ध करणार : सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त कलावंतांचा केला सन्मान

Deepak Chavhan
  • Nov 4 2022 12:20AM
मुंबई,  : प्रत्येकाचा "हॅपिनेस इंडेक्स" वाढविण्याची क्षमता असलेल्या महाराष्ट्रातील कलावंतांची, रंगभूमी व चित्रपट सृष्टीची भरभराट करण्यासाठी यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व सह कलाकारांचा सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी आज सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.ज्येष्ठ अभिनेते आणि कवि किशोर कदम, निर्माते अक्षय बर्दापूरकर, दिग्दर्शक शंतनू रोडे आदी दिग्गज कलावंत यावेळी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत "मराठी" ने गौरवाचे स्थान मिळविले. या गुणी मराठी कलावंतांचा आज सन्मान करताना अभिमानाने ऊर भरून येत आहे.जगात भारत हा सर्वात सुंदर देश आहेच ; सोबतच आमचा जन्म ज्या महाराष्ट्रात झाला ती मायभूमी गुणवान आणि कर्तुत्ववान आहे.दादासाहेब फाळके यामराठी माणसाने चित्रपट भारतियांसमोर आणला. पहिला चित्रपट देखील मराठी, राजा हरिश्चंद्र; त्यामुळे या क्षेत्रात मराठीचे मोठे  स्थान आहे.श्यामची आई, सोंगाड्या, पिंजरा या चित्रपटांची परंपरा आणि वैविध्यता अतुलनीय आहे. ही परंपरा आपण कायम ठेवू , नाट्य मंदिरे उत्तम करुन रंगभूमी निश्चित संपन्न करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभिनेते किशोर कदम, शंतनू रोडे यांनीदेखील मनोगत व्यक्त करुन श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे अभिनंदन केले व हा सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार मानले. आरोह वेलणकर यांनी संचालन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार