सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री फडणवीसांनी केली संतोष देशमुख हत्येची एस. आय. टी. आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे स्थानांतर करण्याचा आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिला.

Sudarshan MH
  • Dec 21 2024 10:12AM

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील माजलगाव तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी घोषणा केली आहे, की विशेष पोलीस पथकाद्वारे आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना मकोका लावण्यात येईल. मागील २ दिवस याविषयी स्थगन प्रस्तावाच्या अंतर्गत चर्चा झाली. त्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.

 
या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे स्थानांतर करण्याचा आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिला. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकरणामध्ये एका आस्थापनाने पवनचक्कीच्या निर्माण कामात गुंतवणूक केली आहे. या कामावरून काही लोकांमध्ये वाद होता. ६ डिसेंबर या दिवशी दुपारी पवनचक्कीचे निर्माण करणार्‍या आस्थापनाच्या कार्यालयात जाऊन काही लोकांनी आस्थापनाचे व्यवस्थापक आणि सुरक्षारक्षक यांना मारहाण केली. व्यवस्थापकाने सरपंचांना दूरभाष केला. या वेळी तेथे सरपंच आले. या वेळी मारहाण करणारे लोक आणि सरपंच यांच्यात वाद झाला. ९ डिसेंबर या दिवशी सरपंच संतोष देशमुख स्वत:च्या गाडीतून जातांना त्यांचा पाठलाग करून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली.’’

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार