सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आकडा टाकून विज चोरी केल्याने २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शहरालगतच्या पातोंडा गावातील अंजली सोसायटी येथे विज कंपनीच्या तारेवर आकडा टाकून विज चोरी करणाऱ्या २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jul 22 2022 9:38AM


नंदुरबार - शहरालगतच्या पातोंडा गावातील अंजली सोसायटी येथे विज कंपनीच्या तारेवर आकडा टाकून विज चोरी करणाऱ्या २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरालगतच्या पातोंडा गावातील अंजली सोसायटी येथील हरीसिंग रितु पाडवी याने १३ हजार ६४० रुपये किंमतीची ८९४ युनिट तर याच परिसरात राहणाऱ्या राजेश मंगा शिंदे यांनी १५ हजार ९४०रुपये किंमतीची ११७६ युनिट विजेची चोरी विज कंपनीच्या तारेवर आकडा टाकून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापरासाठी विज चोरी केली.सदर प्रकार दि.२६ मार्च ते २० जुलै दरम्यान घडला.याप्रकरणी सहा.अभियंता राजीव रंजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार मंगलसिंग कोकणी व पोना वसंत वसावे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार