सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कापसाच्या शेतात गांजाची लागवड बामखेडा येथे साडे ३ लाखांची गांजा झाडे जप्त

बामखेडा येथे साडे ३ लाखांची गांजा झाडे जप्त

Sudarshan MH
  • Oct 18 2022 6:19AM

नंदुरबार - शहादा तालुक्यातील फेस बामखेडा येथे एकाने कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करुन ३ लाख ५२ हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त करुन एकाला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील फेस बामखेडा येथे एकाने कापसाच्या शेतात गांजाची लागवड केली आहे अशी गुप्त माहिती पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले असता स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करुन फेस बामखेडा येथे सदर कापसाच्या शेतात जाऊन पाहणी करून  ३ लाख ५२ हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केली आहे.यावेळी पोलिसांनी राकेश हिरालाल शिरसाठ रा.बामखेडा याचा पाठलाग करुन पकडले.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ,सपोनि संदिप पाटील, हवालदार दिपक गोरे, दादाभाई मासुळ, विकास कापुरे, किरण मोरे, राजेंद्र काटके, दिनेश लाडकर, संजय रामोळे,चेतन चौधरी,शानाभाऊ ठाकरे, विजय गावीत यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार