नंदुरबारमध्ये पहिल्यांदाच घडले; मराठी ऐवजी इंग्रजीत फलक लावणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई
इंग्रजीत फलक लावणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई
नंदुरबार : राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतून असावेत असा निर्णय जानेवारी २०२२ मध्ये घेतला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून संबंधित दुकानांना आदेश देण्यात आले होते. तरीही दुकानाचे नामफलक मराठीतून न लावणाऱ्या तीन दुकानदारांविरुद्ध सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे फौजदारी कारवाई करण्यात आली.
इंग्रजी नामफलकाबाबत कायदा होऊन वर्ष उलटल्यानंतर पहिल्यांदाच कारवाई झाल्याने. दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात मार्च २०२२ मध्ये तपासणी मोहिम हाती घेण्यात आली होती, त्यात ३१ दुकाने आस्थापनांची तपासणी करण्यात आली असता मराठीतून पाट्या नसलेल्या ३१ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यांना त्याबाबत सुचीत करून विभागाने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मराठीतून नामफलक करण्याबाबत दुर्लक्ष केल्याने या तीन दुकानांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना २०१७ नुसार दुकाने निरीक्षक तथा सुविधाकार यांनी फौजदारी कारवाई केली आहे. दुकान मालकांनी नामफलक, पाटी मराठी भाषेतून करून घ्यावी, असे आवाहनही दुकान निरीक्षक जितेंद्र पवार यांनी केले आहे. दरम्यान कारवाई झालेल्यांमध्ये सिंधी कॉलनीतील एम टू एम हब, आर. जी. कलेक्शन आणि यशराज ॲटो पार्टस, धुळे रोड या तीन दुकानांचा समावेश आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प