नंदुरबार मध्ये प्रथम हिंदुराष्ट्र संस्थापक विर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांची ८८२ वी जयंती उत्साहात साजरी.*
विर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांची ८८२ वी जयंती उत्साहात साजरी.
गढ कुंढार नरेश प्रथम🚩हिंदुराष्ट्र संस्थापक झुजौतिखन्ड ( बुंदेलखंड) भूतकालीन शासक विर शिरोमणी महाराजा खेतसिंह जी यांची आज ८८२ वी जयंती निमित्त नंदुरबार खंगार समाजातर्फे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.यानिमित्त बाहेरपुरा हाट दरवाजा परिसर येथे आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक ऊस्फूर्तीने सहभागी झालेत. कार्यक्रमाची सुरवात खंगार कुलदेवी गजानन मातेच्या पूजन-आरतीने करण्यात आली. मान्यवर आणि समाजातर्फे राष्ट्र पुरुष महाराजा खेतसिंह यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर आयुष्यभर देशासाठी सेवा दिलेल्या माजी सैनिकांचा सन्मान हिंदू अधिपती महाराजा खेतसिंह यांची प्रतिमा भेट देऊन करण्यात आला.विर योद्धा खेतसिंह यांचे जीवन वर्णन आणि शौर्यगाथेची अमूल्य माहिती खंगार समाज प्रदेश उपाध्यक्ष श्री.सुमित परदेशी यांनी दिली. तर महिला सुरक्षा आणि राष्ट्-धर्म जागृती पर हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिनी शाखेच्या कु.रागेश्री देशपांडे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. यात माहिती देतांना त्यांनी सध्याच्या चित्रपटांच्या समाज मनावर मोठा परिणाम होत आहे. युवा पिढी चित्रपटांप्रमाणे अनुकरण करण्याच्या प्रयत्न करत आहे. अनेक चित्रपटांत धर्मांध युवक आणि हिंदु युवती यांची प्रेमकहाणी दाखवली जाते. यांतून एकप्रकारे 'लव्ह जिहाद ' ला प्रोत्साहनच मिळत आहे. चित्रपटातून होणारे 'लव्ह जिहाद' चे प्रोत्साहन रोखायला हवे. हे जिहादी संकट रोखण्यासाठी हिंदु मुलींनी धर्माचरण करणे आवश्यक आहे. इ माहिती देण्यात आली. तसेच माजी सैनिक श्री अरविंद निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण आपला शौर्यशाली ईतिहास अभ्यासला पाहिजे.आपण देशासाठी देणे लागतो ज्याप्रमाणे खंगधारी समाजाने भूतकाळात देश धर्माचे रक्षण केले त्याप्रमाणे प्रत्येकाने समाजात वावरताना देशाप्रती नेहमी सैन्यासारखे कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे असे सांगितले.
यानंतर समाजातर्फे कुलदेवीचा महाप्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न झाला.अशा रीतीने राष्ट्र धर्म आणि एकत्रितरित्या समाजपयोगी कार्यक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख मान्यवर माजी सैनिक अनुक्रमे श्री अरविंद निकम,नरेंद्र बागुल, ज्ञानेश्वर शिरसाठ,कैलास शेवाळे,मनीष परदेशी,राजेश गिरनार,राजेंद्र पाटील,खंगार समाजाचे श्री आर सी हरदेकर (राष्ट्रीय उपाध्यक्ष),प्रदेश अध्यक्ष विष्णूजी खोले, श्री गणेश जी गव्हाले,श्री जयराम राजवत तसेच हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु.रागेश्री देशपांडे,श्री.राहूल मराठे,नगरसेवक किरण रघुवंशी (गोलुभैया),रामबाबू रघुवंशी (माजी जि प अध्यक्ष), ,नगरसेवक लकिभैया, पप्पू(मामा) गिरासे तसेच विहिंप आणि सुदर्शन न्यूज चॅनेलचे श्री.केतनभैय्या रघुवंशी,हिंदू सेवा सहाय्य समितीचे श्री.नरेंद्र पाटील,करणी सेनेचे श्री.मुकेश राजपूत, श्री.विकी मोची, भाजप शहराध्यक्ष श्री.नरेंद्रभाऊ माळी,शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे श्री.दिग्विजय ठाकरे तसेच नवजीवन व्यायाम शाळेचे सदस्य उस्फुर्तपणे सहभागी झालेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि गणेश खंगार यांनी तर आभार प्रदर्शन चि आकाश खंगार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व हिंदूप्रेमींनी परिश्रम घेतले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प