तळोदा वसतिगृहात मुलींनी केली मारहाण; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार
मुलींनी केली मारहाण; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार
नंदुरबार : तळोदा शहरातील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात मुलींमध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत एक विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिला तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दिली जाणार असल्याचे मुलींच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे.
वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी काही मुलींना माझ्या मुलीला मारहाण करण्यासाठी दबाव आणला, असा आरोप मारहाण झालेल्या मुलीच्या वडिलांनी केला आहे. चिथवलेल्या त्या मुली कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्रास देतात, यावरून पीडित मुलीचा वाद झाला होता.
या मुलीच्या वडिलांची तक्रार आहे की, तळोदा शहरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रकल्प अधिकारी पाहणीसाठी येतात त्यावेळी त्यांच्यासोबत कुणीही महिला अधिकारी नसतात. माझ्या मुलीने याबाबत आपल्या भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. यामुळे मारहाण झालेली मुलगी व तिचे वडील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस यांच्याकडे मुलीला घेऊन गेले होते. परंतु अशा प्रकारे कृती करू नको, यामुळे वसतिगृहाची बदनामी होते, असे वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलींच्या गटाने व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मारहाण झालेल्या मुलीसोबत मुलींच्या एका गटाची या विषयावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले.
दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी त्या पालकांच्या म्हणण्याचे खंडन केले आहे. प्रकल्प अधिकारी कधीही रात्रीचा सुमारास मुलींच्या वसतिगृहात आलेले नाहीत, याशिवाय ते दुपारी आले असता त्यांनी मुलींच्या वसतिगृहातील महिला गृहपाल व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वसतिगृहाची पाहणी केली. मुलींचा वाद हा व्यक्तिगत आहे. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते अतिशय चुकीचे आहे, असे अर्चना जाधव, गृहपाल, शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, तळोदा यांनी म्हटले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प