सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पटेलवाडीतील चोरीचा एलसीबीने दोन दिवसातच लावला छडा !

अजबच : भाडेकरुच निघाला चोर

Sudarshan MH
  • May 6 2023 9:53PM



नंदुरबार :- शहरातील पटेलवाडी परिसरात राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटामधून सुमारे ९ लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार गुन्हा अन्वेषण शाखेने दोनच दिवसात गुन्हा उघडकीस आणला असून या घटनेत भाडेकरू म्हणून राहत असलेलाच चोरटा निघाल्याने सर्वानाच आश्यर्याचा धक्का बसला आहे.  

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दि.२ ते ४ मे दरम्यान पटेलवाडीतील प्लॉट नंबर ११५ मधील रहिवासी शेख युसुफ शेख चांद यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटामधून ८ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले होते. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्याचवेळी शेख युसुफ शेख चांद यांच्या घरात भाडेकरु म्हणून ३ वर्षापासून राहत असलेले जुबेर इब्राहिम शहा याने देखील त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याबाबत सांगितल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

जुबेर शहा यांच्या घरात झालेल्या घरफोडीच्या घटनास्थळाची श्री.पाटील पाहणी करीत असतांना जुबेर शहा यांना काही प्रश्न विचारण्यात आले मात्र, ते घरात चोरी झाल्याचा बनाव करीत असल्याचा संशय आला. म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन जुबेर शहा यास सखोल विचारपूस करण्याचे आदेश दिले.

पथकांनी जुबेर इब्राहीम शहा विचारपुस केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर मात्र त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेला ८ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम मुद्देमाल देखील त्याच्याच घरातून काढुन दिला. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले.  सदर कामगिरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस नाईक राकेश मोरे, भटु धनगर, पोलीस अंमलदार अभय राजपुत, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें