सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरीट शिवारातून दीड लाखांंच्या ठिबक नळ्या चोरल्या

नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातून शेती साहित्य चोरीच्या घटना काही दिवसापासून थांबलेल्या असताना मात्र कोरीट शिवारातील शेतातून चोरट्याने दीड लाख रुपये

Sudarshan MH
  • May 15 2023 5:57PM


नंदुरबार :- नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातून शेती साहित्य चोरीच्या घटना काही दिवसापासून थांबलेल्या असताना मात्र कोरीट शिवारातील शेतातून चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या चोरुन नेल्या आहेत. यामुळे या भुरट्या चोरट्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील कोरीट शिवारात ब्रिजलाल भिक्कन चौधरी यांचे सर्व्हे क्र.२१६ मधील विहिरीजवळून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीच्या ठिबकच्या नळ्या चोरुन नेल्या आहेत. ब्रिजलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ.कैलास मोरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार