सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अधिपत्याखालील पालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

माजी आ.शिरीष चौधरी यांचा आरोप : नाट्यमंदिरात कार्यालय सुरु करण्याचा इशारा :

Sudarshan MH
  • May 16 2023 3:44PM




नंदुरबार :-  पालिकेच्या मालकीच्या वास्तू ज्या संस्थांना दिल्या आहेत त्यांच्याकडूनच लाईट बिल, दुरुस्ती व देखभालीचा खर्च वसूल करणे आवश्यक आहे. मात्र माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अधिपत्याखालील पालिकेने गेल्या १६ वर्षात कोट्यवधींचा रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.  पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंग यांनी १२ मे पासून छत्रपती नाटय मंदिराचे बुकींग यापुढे पालिकेच्या बांधकाम विभागाकडे करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतांना श्री.रघुवंशी हे नाटय मंदिरातील कार्यालयात बसून पत्रकार परिषदा घेतात. ते बंद करण्यात यावे, अन्यथा आम्हीदेखील नाटय मंदिरात आमच्या बैठका सुरु करुन कार्यालय सुरु करू, असा इशारा शिरीष चौधरी यांनी दिला. 

छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिराशेजारील डोम पालिकेने ताब्यात घेतल्यानंतर गेल्या तीन चार दिवसांपासून समाज माध्यमातून विविध चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर काल दि.१४ रोजी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी डोमबाबत आपली भुमिका पत्रकारांसमोर मांडली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज माजी आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली.  

यावेळी शिरीष चौधरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर,  इंदिरा मंगल कार्यालय, सी.बी.गार्डन, संजय टाऊन हॉल अशा वास्तूंना मालमत्ता कर लागणार नाही, असा संभ्रम निर्माण केला जात असल्याचा निष्कर्ष पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंग यांनी काढला असून या वास्तू ज्या संस्थांना दिल्या आहेत त्यांच्याकडूनच लाईट बिल व इतर दुरुस्ती व देखभालीचा खर्च वसूल करणे आवश्यक आहे. 

ते पुढे म्हणाले की, नाटय मंदिराचे भाडे आकारतांना लाईट बिल वेगळे आकारले जाते. सदर लाईट बिल संबंधीतांकडून वसूल केले जाते, तरीही सदर लाईट बिल नगरपालिकेतर्फे भरले जाते, नाटय मंदिराची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधीत संस्थेवर असतांना मध्यंतरीच्या काळात केलेल्या देखभाल दुरुस्तीचा खर्च पालिकेने केला आहे. याशिवाय नाटय मंदिरात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा पगारही संबंधीत संस्थेने देणे बंधनकारक असतांना हा पगारही पालिकाच देते, मग संस्था केवळ पैसे गोळा करण्याचेच काम करते का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
  
पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी पुलकित सिंग यांनी १२ मे पासून छत्रपती नाटय मंदिराचे बुकींग यापुढे पालिकेच्या बांधकाम विभागाकडे करण्याचे आदेश दिले आहेत, असे असतांना श्री.रघुवंशी हे नाटय मंदिरातील कार्यालयात बसून पत्रकार परिषदा घेतात व इतर बैठकाही तेथे घेतात, ते बंद करण्यात यावे, अन्यथा आम्हीदेखील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नाटय मंदिरात आमच्या बैठका व कार्यालय सुरु करू इशारा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शेवटी दिला. 

यावेळी पालिकेचे माजी गटनेते चारुदत्त कळवणकर, माजी नगरसेवक आनंद माळी, प्रशांत चौधरी, निलेश पाडवी, लक्ष्मण माळी, लियाकत बागवान आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार