सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निजामपूर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस कर्मचारीचा विनयभंग;पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करण्यात

महिला पोलीस कर्मचारीचा विनयभंग;पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करण्यात

Sudarshan MH
  • Jun 4 2023 6:21PM
निजामपूर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस कर्मचारीचा विनयभंग;पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई;जमावाने रास्ता रोको केल्यानंतर गुन्हा दाखलनिजामपूर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस कर्मचारीचा विनयभंग;पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई;जमावाने रास्ता रोको केल्यानंतर गुन्हा दाखल
जैताणे-निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी योगिता मच्छिन्द्र बाचकर यांचा दिनांक 3 जून 2023 रोजी वृंदावन कॉलोनी परिसरात मोईन पिंजारी याने विनयभंग केला.त्यावेळी सदर महिला पोलीस वट सावित्री निमित्त पूजेसाठी जात होत्या.घडलेल्या प्रकारबाबतीत त्यांनी मोईन च्या आई वडिलांना सांगितले असता त्यांनीही लज्जास्पद वक्तव्य करत महिला पोलीस कर्मचाऱ्यास अपमानित केले.
    दुपारी कर्तव्यावर हजर झाल्यानंतर योगिता बाचकर यांनी हा प्रकार स.पो.नि.हनुमंत गायकवाड यांना ते पेट्रोलिंग साठी बाहेर असल्याने फोनवरून कळवली.त्यानुसार पोलीस ठाण्यात फिर्यादीची तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविणे आवश्यक होते.मात्र गुन्हा दाखल होण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई झाल्याने हा प्रकार महिला पोलीस कर्मचारीने गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर टाकली.त्यानंतर गावातील तरुणांचा जमाव पोलीस स्टेशन च्या आवारात जमा झाला.तरीही ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून जमावाने काही काळ पोलीस स्टेशन समोर साक्री नंदुरबार रस्त्यावर ठिया आंदोलन केले.शेवटी पोलीस स्टेशनला वीज नाही या कारणाने गुन्हा दाखल करण्यात उशीर होत असल्याचे सांगण्यात आले.पण जमावाच्या प्रभावामुळे सहायक पोलीस  निरीक्षक यांच्या सूचनेनुसार निजामपूर पोलीस स्टेशन गु.र.         /2023, भादवी 354,354(ब),504,506 अन्वये आरोपी मोईन गुलाब पिंजारी व त्याच्या आई वाडीलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयचा पुढील तपास पो.उ.नि.सागर काळे करत आहेत.
     आरोपी मोईन पिंजारी हा आर.टी.ओ.वाहनावर चालक म्हणून कार्यरत असल्याचे समजते.यावेळी गुन्हा नोंदविण्यात झालेल्या दिरंगाई बद्दल जैताणे उपसरपंच बाजीराव पगारे,आमखेल सरपंच ज्ञानेश्वर पवार ,जैताणे माजी सरपंच संजय खैरनार, माजी सरपंच ईश्वर न्याहळदे,प्रकाश पाटील आदींनी नाराजी व्यक्त केली तसेच आ.मंजुळताई गावित यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आक्षेप ज्ञानेश्वर पवार,संजय खैरनार,ईश्वर न्याहळदे यांनी घेतला आहे.पोलीस कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय अशी चर्चा उपस्थित जमावमध्ये यावेळी होत असल्याचे पहावयास मिळाले.
    फिर्याद

निजामपुर पोलीस स्टेशन दि.04/06/2023

मी योगीता मच्छींद्र बाचकर वय 27 व्यवसाय महीला पोलीस अंमलदार ब.नं.928 रा.वृंदावन कॉलणी निजामपुर ता साक्री जि धुळे

समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद लिहुन देते की,मी वरील ठिकाणी निजामपुर पोलीस स्टेशनला सुमारे 5 वर्षापासुन नेमणुकीस आहे. तसेच माझे पती अवधुत होंडे हे देखील नोकरीस असुन मला 2 मुली आहेत.निजामपुर पोलीस स्टेशन येथे कर्तव्य असल्याने आम्ही निजामपुर गावात वृंदावन कॉलणी निजामपुर येथील घरमालक भामरे यांचे घरात भाडयाने राहतो. आमचे बिल्डींग मध्ये मोईन गुलाब पिंजारी हा देखील त्याचे परिवारासह भाडयाने राहण्यास आहे.

काल दि.03/06/2023 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मी वटपौर्णिमा पुजेसाठी घराबाहेर निघुन जात असतांना मोईन पिंजारी याने त्याच्याकडील कचरा असलेला पृष्ठाचा बॉक्स वरुन मला बघुन माझे अंगावर टाकल्याने पृष्ठामधील कचरा माझ्या अंगावर पडला, म्हणुन मी त्याला विचारण्यासाठी गेली असता त्याने मला सांगीतले की, तो माझ्या मुलांचे खेळण्याचा बॉक्स आहे. तो माझ्या मुलाने खाली टाकला आहे. त्यावेळेस मी त्याला सांगीतले की,मी तुला बॉक्स माझ्या अंगावर फेकतांना पाहीले आहे असे सांगीतले असता, त्याने मला मोठया आवाजात वाईट वाईट शिवीगाळ केली व मी तेथुन निघत असतांना त्याने माझा हात मला लज्जा वाटेल अशा रितीने पकडुन धमकावु लागला की, तु पोलीस असुन कशी आहेस हे मला माहीती आहे.तु पोलीस खात्यात तु कशी काम करते,तेच बघतो असे धमकावुन तो माझे अंगावर थुंकला. व मला अश्लील शिवीगाळ करु लागला. तेव्हा तेथे त्याची आई (पुर्ण नाव माहीती नाही) व त्याचे वडील गुलाब पिंजारी असे तेथे आले व देखील मला बोलु लागले की, माझा मुलगा तुझे अंगावर थुकला.तु आम्हाला माहीत आहे कशी आहे,व तु किती पतीव्रता आहे हे आम्हाला माहीती आहे.व तु येथुन निघुन जा नाहीतर तुला व तुझे परिवारातील लोकांना गायब करुन टाकु अशी ते मला धमकी देवु लागले. सदरचा प्रकार हा मागील काही दिवसापासुन सुरु होता. परंतु मी नोकरीमुळे त्याकडे दुर्लक्ष करीत होती. परंतु दि.03/06/2023 रोजी घडलेला हा अत्यंय भयावह होता. सदर प्रकारामुळे मी घाबरुन निजामपुर पोलीस स्टेशनला आली. त्यानंतर मला 13.00 ते 20.00 डयुटीस असल्याने मी पोलीस स्टेशनला येऊन,सपोनि/गायकवाड सो,पेट्रोलींग करीता गेले असल्याने सदर घडलेला प्रकार मी सपोनि/गायकवाड सो,यांना फोनदवारे सांगीतला.व आज रोजी काल दि.03/06/2023 रोजी झालेल्या प्रकाराबाबत मी आज रोजी मोईन गुलाब पिंजारी व त्याची आई-पुर्ण नाव माहीत नाही व वडील गुलाब पिंजारी रा.निजामपुर वृंदावण कॉलणी यांचेविरुदध फिर्याद देण्यासाठी आली आहे. व

माझी वरील संगणीकृत फिर्याद मी वाचुन पाहीली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे. समक्ष ही फिर्याद लिहुन दिली

सही दि. 04/06/2023

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार