सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निजामपूर येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल....आरोपींची धुळे कारागृहात रवानगी....

आरोपींची धुळे कारागृहात रवानगी....

Sudarshan MH
  • Jun 13 2023 9:07AM





*अल्पवयीन मुलीची छेड : निजामपूर येथील चौघांवर गुन्हा दाखल, चौघांची धुळे बाल सुधार कारागृहात रवानगी....*                  धुळे दि१२:- निजामपूर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयितांना लागलीच निजामपूर पोलिसांनी अटक करून त्यांना धुळे बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे।                             तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे की, त्यांची मुलगी गावात क्लास ला जात असताना तिचा रस्ता अडविणे, हातवारे करणे तिचा मानसिक छळ करणे असा प्रकार  सुमारे एक वर्ष पासून सुरू होता, निजामपूर गावातीलच रहिवासी असलेले आयान फरीद खाटीक, रेयान अल्ताफ तांबोळी, मुजाहिद्द मोसिन पठाण,व मुजबबील युनूस खाटीक हे तिला त्रास देत होते तसेच आयान हा नेहमी मुलीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी बोल नाही तर घरात येऊन मारहाण करू अशी धमकी देत होता, दि.३० मे रोजी मुलगी क्लास ला जात असताना आयान याने मुलीच्या समोर वीस रुपये फेकून तू आम्हाला चोकलेट घेऊन ये व आम्हाला खाऊ घाल अशी धमकी दिली यावेळी देखील त्याचे मित्र सोबत होते, या सर्वाचा त्रास कमी व्हावा म्हणून मुलीने चॉकलेट घेऊन त्यांना दिले तरी देखील त्यांनी त्रास देणे बंद न केल्याने मुलीने सदर प्रकार आपल्या आईकडे सांगितला, अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिल्याने निजामपूर येथील आयान फरीद खाटीक, रेयान अल्ताफ तांबोळी, मुझहीद मोहसिन पठाण व मुजबबील युनूस खाटीक सर्व रा. निजामपूर यांच्या विरोधात भांदवि कलम ३५४-डी, ३४१,५०६,३४, बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम १२ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चारही संशयित हे १५ ते १८ वयोगटातील असून दोघांनी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, दरम्यान गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलीस ठाण्याचे सपोनि हनुमंत गायकवाड यांनी चारही संशयितांना अटक करून सायंकाळी त्यांची रवानगी धुळे बाल सुधार गृहात केली असल्याचे सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार