सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात सन 2016 ते 2019 या आर्थिक वर्षामध्ये शासकीय विविध योजना

राबविण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या निधीत कोट्यवधी रुपयांची अनियमितता तसेच लाखो रुपये वसूल पात्र असल्याचा

Sudarshan MH
  • Jun 13 2023 4:42PM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा 7057203888
                   अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात सन 2016 ते 2019 या आर्थिक वर्षामध्ये शासकीय विविध योजना राबविण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या  निधीत कोट्यवधी रुपयांची अनियमितता तसेच लाखो रुपये वसूल पात्र असल्याचा लेखापरीक्षण अहवालानुसार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात १३ एप्रिल रोजी अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता या पैकी एका आरोपीतास अटकपूर्व जामीन मंजूर असून इतरांना औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे पुढील सुनावणी 19 जून रोजी होणार आहे.
              अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध शासकीय योजनांमार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधी प्राप्त झालेला होता या निधीच्या खर्चाबाबत लेखा परीक्षण अहवालात सन 2016 ते 2019 या तीन आर्थिक वर्षामध्ये तीन कोटी 28 लाख 79 493 रुपयांची  रुपयांची आर्थिक अनियमितता आढळून आली आहे तसेच सन 2016 ते 2019 या आर्थिक वर्षात लेखा परीक्षण अहवालात दहा लाख 87 हजार 775 रुपये वसूल पात्र असल्याचे लेखापरीक्षणावालातून समोर आले होते यासंदर्भात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी भूषण कीर्ती कुमार पाडवी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तत्कालीन गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी लेखा परीक्षण अहवालानुसार दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता ४२० ,४१९ ,३४ प्रमाणे आरोपी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासक तथा विद्यमान पंचायत समिती अक्कलकुवा येथील कृषी  अधिकारी जगदीश सदाशिव बोराळे तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासक तथा तळोदा पंचायत समिती ग्राम विस्तार अधिकारी असलेले मनोज रामचंद्र देव तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सध्या तळोदा पंचायत समितीत कार्यरत ग्राम विकास अधिकारी विजय भोमा जाधव तत्कालीन व विद्यमान सरपंच उषाताई प्रवीण बोरा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आनंदा ओजना पाडवी तत्कालीन ग्राम कोष समिती अध्यक्ष उमेश गंगाराम पाडवी तत्कालीन ग्राम कोष सदस्य श्रीमती राजश्री इंद्रसिंग पाडवी तत्कालीन ग्रामकोष समिती अध्यक्ष ईश्वर जोलु वळवी तत्कालीन ग्राम कोष समिती सदस्य श्रीमती सुपडीबाई बुधा पाडवी तत्कालीन ग्राम कोष समिती अध्यक्ष अमरसिंग हुपा वळवी तत्कालीन ग्राम कोष समिती सदस्य श्रीमती लता प्रताप सिंग पाडवी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून यांतील सरपंच उषाताई प्रवीण बोरा यांना सुट्टीच्या काळातील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून इतर आरोपींना अंतरिम जामीन औरंगाबाद खंडपीठाने आठवड्यातून एकदा पोलीस ठाण्यात हजर राहणे ,पुराव्यांमध्ये हस्तक्षेप न करणे तसेच तपासात सहकार्य करण्याच्या अटी शर्तींवर मंजूर केला आहे पुढील सुनावणी 19 जून रोजी होणार आहे.
चौकट १)=अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध योजनातून विकास करण्यासाठी शासकीय निधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यात आली नसल्याने ते मोकाट असून तपास अधिकारी यांनी आरोपींना अटक करून त्यांची कसून चौकशी केल्यास झालेला भ्रष्टाचार उघड होईल मात्र संबंधित यंत्रणा आरोपींना पाठीशी घालत असल्याने तपासी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय येत आहे.  याचिकाकरते भूषण कीर्तीकुमार पाडवी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले
चौकट२) या गुन्ह्यातील आरोपींना सुट्टीच्या काळातील माननीय औरंगाबाद खंडपीठ ने अंतरिम जामीन मंजूर केला असून या गुन्ह्यातील तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत जिल्हा परिषद कार्यालयाकडून आवश्यक ती माहिती मिळण्यास दिरंगाई होत असल्याने सबळ पुरावे शोधून शासनाची वसुल पात्र रक्कम वसूल करणे साठी तसेच त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपास सुरू असल्याचे तसेच माननीय न्यायालयात आमची तपासाची बाजू मांडल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार