सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोलगी परिसराला समस्यांचे मृगजळ. मोलगी तालुका निर्मितीसाठी आमरण उपोषण.

विविध मागणीसाठी नागरिकांचे बेमुदत उपोषण

Sudarshan MH
  • Jun 15 2023 4:03PM
अक्कलकुवा प्रतिनिधी -योगेश्वर बुवा.7057283888
    मोलगी परिसराला समस्यांचे मृगजळ.
मोलगी तालुका निर्मितीसाठी आमरण उपोषण.
       विविध मागणीसाठी नागरिकांचे बेमुदत उपोषण.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेवून माहिती जाणून घेतली.यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी रामसिंग वळवी यांच्या शी भ्रमणध्वनीवर संभाषण करून यथायोग्य मदतीचे आश्वासन दिले.
       स्वतंत्र भारताचाच अविभाज्य भाग असलेल्या मोलगी परिसराला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटत नाही.  वर्षानुवर्षे ते प्रलंबित राहिल्या या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु प्रशासन त्याची दखलच घेत नाही. त्यामुळे नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले असून त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. 
          
         मोलगी परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे नितांत आवश्यक आहे. परंतु सुविधा होण्याऐवजी या भागातील नागरिकांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडत आहे. स्वातंत्र्योत्तर कालावधीत या परिसरातील जाणकार,संघटना व विविध घटकांच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु अपेक्षेनुसार समस्या सुटत नसल्याने पुन्हा हे आंदोलन करण्यात येत आहे.हे उपोषण दि.८ जून पासून सुरू असून मागण्यांची दखल घेतली न गेल्यामुळे हे आमरण उपोषण बेमुदत सुरुच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.आज उपोषणाच्या सातवा दिवस असून उपोषणकर्त्यांमध्ये रामसिंग वळवी,माजी पंचायत समिती सभापती रुषाताई वळवी, बटेसिंग वळवी,बारदा वळवी,दिनेश वळवी,बामण्या वळवी,यांचा समावेश आहे.  यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये मोलगी तालुका निर्मिती करणे,नर्मदा काठावरील शाळा स्थलांतर थांबविणे,खेडोपाड्यातील लाईटचा प्रश्न सोडविणे.
तळोदा प्रकल्प कार्यालयाचे उप कार्यालय मोलगी येथे सुरु करणे.मोलगी परिसरासाठी नायब तहसीलदार व गटविकास अधिकारी पद मंजूर करणे,मोलगी येथे नवीन राष्ट्रीयकृत बँकेची मागणी,मोलगी येथील ग्रामिण रुग्णालयाला जिल्हा उप रुग्णालयाचा दर्जा देऊन आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे,परिसरातील महसुली गावांचे सीमांकन करणे,परिसरातील प्रधान मंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे,ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करणे,डोंगराळ भागातील सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, आरोग्य रक्षक, कृषी सहाय्यक यांनी आपल्या सजेच्या ठिकाणी राहून लोकांना सेवा देणे,मोलगी येथील ग्रामिण रुग्णालयाला जिल्हा उप रुग्णालयाचा दर्जा देऊन आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
परिसरातील महसुली गावांचे सीमांकन करणे,परिसरातील प्रधान मंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरवस्था,ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करणे,डोंगराळ भागातील सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी,ग्रामसेवक, वनरक्षक,आरोग्य रक्षक,कृषी सहाय्यक  यांनी आपल्या सजेच्या ठिकाणी राहून लोकांना सेवा देणे.  
                अशा अनेक मागण्यांसाठी शासकीय विश्रामगृह मोलगी येथील उप विभागीय अभियंता सा. बा.विभाग यांचे उप विभागीय कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू आहे.आज राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक अनिल जावरे, पत्रकार तुषार नाईक यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली माहिती जाणून घेतली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार