*2019 चे नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर भूमाफियाना मदद करून शासनाचे 11 कोटी महसूल नुकसान केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व विभागीय चौकशी सुरू*
फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व विभागीय चौकशी सुरू*
सुदर्शन न्युज ने मागील दोन भागात नंदुरबार जिल्ह्यातील भूमाफियांची पोलखोल करीत प्रशासनास कार्यवाही करणेस भाग पाडले असून शासनाने 2019 चे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले असून खातेनिहाय विभागीय चौकशी नेमण्यात आली आहे. त्या चौकशीचे अधिकारी म्हणून नाशिकचे विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती राज्यशासनाने केली असून त्या चौकशी दरम्यान अधिकारीना बालाजी मंजुळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनेक भूमाफियांना लाभ होईल असे बेकायदेशी व बोगस आदेश मनमानी पद्धतीने पारित करून शासनाचा जवळ जवळ 11 कोटी रुपयांचा महसूल नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्या कारणाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नंदुरबार जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे.
सदर भूमाफियांनी 2008 ते 2020 पावेतो अनेक शासकीय, कुलकायदा, इनाम, देवस्थान, गुरचरण, गावठाण जमिनी बालाजी मंजुळे सारख्या अनेक भ्रष्ट अधिकारीच्या संगनमताने गिळंकृत केल्याचे सुदर्शन न्युज ने जनते समोर मांडले आहे , आज त्याचे फलित म्हणून ही कार्यवाही झाल्याने अनेक हितचिंतकांनी शुभेच्छा व समाधान व्यक्त केले आहे , माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी 2000 ते 2020 पर्यंतचे सर्व महसूल दप्तर चौकशी पथक नेमल्यास अनेक भूमाफियांनी शेकडो एकर जमीनीचा कोट्यवधींचा शासकीय महसूल बुडवून व शर्तभंग करून आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या नावे केले असल्याचे उघड होईल , तरी सदर चौकशी लवकरात लवकर नेमून जिल्ह्यातील अनेक भ्रष्ट अधिकारीना व भूमाफियाना गजाआड करण्याचे अपेक्षा जनतेने बोलून दर्शविले आहे.
केतन रघुवंशी
सुदर्शन न्युज , नंदुरबार
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प