नंदुरबार, दि.21 : खरीप हंगाम 2021-2022 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्यावतीने चना खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आधारभूत दराने ही खरेदी करण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम.एस.सोनवणे यांनी केले आहे.
चनाचा आधारभूत दर प्रति क्विंटल 5 हजार 230 रुपये असेल शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येईल. धुळे तालुका खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे (99578 33707 ), शिरपूर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि.शिरपूर जि.धुळे ( 94221 23929),शिंदखेडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे (92844 29877 ), शेतकरी सहकारी संघ साक्री जि.धुळे (94218 85866) शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार (97632 86860), शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा जि.नंदुरबार (77220 14465 ) चना नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2021-2022 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्यांची मूळ प्रत, आधार कार्ड, बॅक खाते बुक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहितीची नोंदणी वरील ठिकाणी नोंदवावी. शासनाचे खरेदी आदेश मिळाल्यावर शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएसएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333