तळोदा- शहरातील बायपास रस्त्यावर एका पंक्चरच्या
दुकानासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकली घ्या डिक्कीतुन अज्ञात चोरट्याने १ लाख ६० हजार रुपयांची रोकड व बँक
दुकानासमोर उभ्या असलेल्या मोटारसायकली घ्या डिक्कीतुन अज्ञात चोरट्याने १ लाख ६० हजार रुपयांची रोकड व बँक पासबुक चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम उठा मराठे (रा.रांझणी) यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल पंक्चर काढण्यासाठी बायपास रस्त्यावरील केरला टायर्स या दुकानासमोर उभी केली असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये रोख व बँक पासबुक, एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आदि.कागदपत्रे चोरुन नेली.सदर घटना दि.१३ जुन रोजी दुपारी १.३० वाजता घडली.याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार सुधीर गायकवाड करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प