नंदुरबार दि. 14 : करणखेडा, पाचोराबारी, टोकर तलाव आणि देवकड येथील शेतकऱ्यांना उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी ई-पीक प्रणालीबाबत मार्गदर्शन केले.
श्री.क्षीरसागर यांनी शेतकाऱ्यांच्या शिवाराला भेट देऊन नव्या प्रणालीची माहिती शेतकऱ्यांना दिली. ही प्रणाली पारदर्शक असल्याने शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल. शेतकऱ्याने स्वतः ही प्रणाली हाताळायची असून ती अत्यंत सोपी व सुलभ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तलाठी जयेश राऊळ आणि आर.के. गावीत उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333