नाशिक: नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे तीन मंत्री झाले आहेत. तर मंत्रिपद मिळाले नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत.
सरकार स्थापन होऊन आताशी चार दिवस झाले आहेत. अद्याप राज्यसभा आहे. तसाही छगन भुजबळ यांना कोणी वादा केला होता. जरासा दम काढायला हवा. मला वाटतं, की भुजबळांनी देशाचे पंतप्रधानही व्हावं. पण, मला जे वाटतं ते जगात होईल असे नाही. ज्यावेळी पक्ष बाजूला झाला आणि त्यांना मंत्रिपद मिळालं तेव्हा आम्ही कुणीही नाराज झालो नाही. त्यांच्या मंत्रिपदाचं स्वागतच केलं. त्यामुळे बाकी कुणी नाराज होण्याचं कारण नाही,’ अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांच्या नाराजीनाट्यावरून टोलेबाजी केली.
छगन भुजबळ यांना मंत्रिपदाबाबत कोणी वादा केला होता? हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते नाराज आहेत, असे चित्र निर्माण झाले मात्र गेली २० वर्ष आम्ही आमदार आहोत. यंदा पहिल्यांदाच आम्हाला संधी मिळाली, असे देखील कोकाटे यांनी सांगितले.