प्रतिनिधि:-नाशिक
नाशिक महानगरपालिके ने शहर बस सेवेसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. शहर बस सेवेचे कामकाज दि. ०८ जुलै २०२१ रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. नाशिक शहर बस सेवेच्या ११५ बसेस तिसऱ्या टप्प्यात कार्यान्वित झालेल्या आहेत.शहर बस सेवेच्या प्रवाशांसाठी इटीम मशीन द्वारे वाहक मार्फत तिकिटे देण्यात येतात.
नाशिक शहर बस सेवेसाठी सिटिलिंक ने प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट / पासेस काढण्याची सुविधा सिटिलिंकच्या मोबाईल एप - नाशिक सिटी बस व वेबसाईट https://citilinc.nmc.gov.in/ वरून यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच ऑनलाईन तिकीट सुविधा उपलब्ध करण्यासाठी सिटिलिंक ने पेटीएम बरोबरही सामंजस्य करार केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सुरक्षित राहण्यासाठी व कॅशलेस प्रवास करण्यासाठी पेटीएम एप द्वारे प्रवासी तिकीट काढले जाऊ शकते.
पेटीएम द्वारे तिकीट काढण्याचे फायदे:
१. पेटीएम द्वारे QR कोड आधारित तिकीट, पेटीएम वॉलेट, UPI, नेट बँकिंग, कार्डसह सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंटचा वापर करून खरेदी केले जाऊ शकते.
२. पेटीएम द्वारे तिकिट खरेदी केल्याने पैश्यांचा प्रत्यक्ष वापर कमी होऊन व्यवहारात पारदर्शकता अचूक राहते.-
३. पेटीएम द्वारे तिकीट आगाऊ काढले जाऊ शकतात.
४. पेटीएम द्वारे काढलेले तिकीट मोबाईल मधून कंडक्टर चे ईटीएम मशीन QR कोड द्वारे स्कॅन करून तपासता येते.
५. पेटीएम द्वारे तिकीट काढल्याने प्रवाशांना अथवा सिटिलिंक कंपनीला कुठलेही कमिशन द्यावे लागत नाही.
६. पेटीएम एप द्वारे प्रवाशाने तिकीट काढल्यास, प्रवाश्यास पहिले तिकीट मोफत दिले जाणार आहे.
७. पेटीएम द्वारे झालेल्या तिकीट विक्रीची रक्कम थेट नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या बँक खात्यात जमा होते, त्यामुळे रेव्हेन्यू सुरक्षित राहण्यास मदत होते व हिशोब अचूक होण्यास मदत होते.
सिटिलिंक करिता पेटीएम द्वारे देण्यात येणाऱ्या सेवेचा शुभारंभ दि. २७/१०/२०२१ रोजी मा.श्री.कैलास जाधव, आयुक्त म.न.पा. तथा अध्यक्ष, सिटिलिंक कंपनी यांचे हस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमास एस.एम.चव्हाणके, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटिलिंक बी.जी.माळी,कार्यकारी अभियंता वंसत गायधनी, महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिक) मिलिंद बंड,महा व्यवस्थापक (वाहतूक)आंकित चौधरी, प्रमुख - स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, पेटीएम स्मृती रंजन, क्षेत्रीय प्रमुख - वेस्ट इंडिया, पेटीएम
सुदिप्ता पट्टनायक, एनपीसीआय ,राजेश वाघ, व्यवस्थापक - सिटिलिंक,रंजीत ढाकणे, व्यवस्थापक - सिटिलिंक.संदीप लांजेवार, प्रकल्प संचालक - पॅलॅडियम (प्रकल्प सल्लागार)
.यशवंत नामसानी, प्रकल्प व्यवस्थापक - पॅलॅडियम (प्रकल्प सल्लागार)व सिटिलिंक कंपनी चे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.