सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्षांनी सर्व विंगच्या पदाधिकार्यांची तातडीची बैठक, सोमवारी धरणे आंदोलन.

सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसी आरक्षण रहित निवडणुका घेण्याच्या उद्देशाने ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचा निवासस्थानी शहरातील सर्व विंगच्या पदाधिकार्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.

Snehal Joshi .
  • Mar 4 2022 10:07PM
सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसी आरक्षण रहित निवडणुका घेण्याच्या उद्देशाने ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचा निवासस्थानी शहरातील सर्व विंगच्या पदाधिकार्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षण बाबत तसेच ओबीसी वसतिगृह व इतर समस्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. ओबीसीचा लढा हा आत्मसन्मानाचा लढा असून सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारल्याने देशातील ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. यावर आता या देशातील सर्व जातीची जातिनिहाय जनगणना हाच अंतिम पर्याय आहे. आज आम्हाला आमच्या अधिकार हक्कासाठी सरकारकडे वारंवार मागणी करावी लागत आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये राज्य सरकार असो वा केंद्र सरकार ओबीसी जातीचे विभाजन करून मतासाठी उपयोग करीत आहे. हे ओबीसी बांधवाच्या लक्षात येत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, नेते मंडळींनी ओबीसी समाजाची दिशाभूल करणे टाळून ओबीसीच्या हक्काचा आवाज उठविला पाहिजे. देशातील ओबीसी बांधवांनी तमिळनाडू राज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या राज्यात मिळविलेले ५२% आरक्षण हा ओबीसी समाजासाठी आदर्श आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात सर्व ओबीसी संघटनांना आवाहन करण्यात येत आहे कि “आपल्या एकीचे बळ हेच आपले फळ राहील” आज घडीला राजकीय आरक्षणाला हात घालणात आला, उद्या नोकरी विषयक, शिक्षणातील आरक्षण गमावून बसण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ह्या हक्काच्या लढाईत प्रत्येक ओबीसी बांधवांनी हि लढाई लढलीच पाहिजे, असे दृढनिश्चयी आव्हान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी देशातील ओबीसी बांधवांना केले आहे. त्याची सुरुवात दिनांक ७ मार्च २०२२ ला सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन आणि संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत ओबीसीचा मार्च काढण्याचे ठरले आहे. संविधान चौकात १० ते १ या वेळात मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी जमा व्हायचे आहे. तसेच दिनांक ६ मार्च २०२२ ला सकाळी १० वाजता देशव्यापी झूम मिटींगचे आयोजन केले आहे यात सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सहभागी व्हावे.

 

तसेच दिनांक २३ मार्च २०२२ ला सकाळी १० ते २ या वेळात दिल्ली येथील जंतर मंतर येथे देशातील सर्व राज्यातील ओबीसी संघटनांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. या सर्व आंदोलनात विविध राज्यातील लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आजच्या सभेमध्ये करण्यात आले आहे.

 

या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, केंद्रीय सहसचिव शरद वानखेडे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या सुषमा भड, कल्पना मानकर, विजया धोटे, वृंदाताई ठाकरे, रेखाताई बाराहाते तसेच शकील पटेल, संजय पन्नासे, गुणेश्वर आरीकर, राजू चौधरी, रवी देशमुख, शरद वाटकर, ऋतिका डाफ, राजेश काकडे, विजय पटले, अॅड. पुरुषोत्तम पाटील, अॅड. विनोद खोबरे, अॅड. समीक्षा गणेशे, संजय मांगे, दिलीप भोयर, घनश्याम मांगे, संजय मांगे, राजेश राहटे, गणेश नाखले, ईश्वर ढोले, मयुर वाघ, पराग वानखेडे, ऋषभ राऊत, प्रवीण बावनकुळे, परमेश्‍वर राऊत, नाना झोडे, नयना झाडे, डॉ. राजू गोसावी, शरयू तायवाडे, सोनिया वैद्य, वय टी कटारे, श्रीकांत मसमारे, संजय मांगे, निलेश कोढे, सुधाकर तायवाडे, राजू मोहोड, विजय पटले, नामदेव भुयारकर, सुभाष धबाले, गजेंद्र कारेकर, हेमंत गावंडे, विनोद उलीपवार, राजेश वराडे, प्रमोद लेंडे, इत्यादी सभासद मोठ्या संख्येने हजर होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार