पंढरपूर: सध्या सोशल मीडियाचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप स्टेटस ठेऊन पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. त्यातून समाजातील धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासना समोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मात्र, सध्या अनेक युवक सोशल मीडियाच्या आहारी जात असून त्याचा दुरुपयोग होत आहे.
पंढरपूर शहरातील काही व्यक्ती धर्म विरोधी कृत्य करुन समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण करत असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष (पंढरपूर) यांच्याकडून करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करीत असतांना, श्री क्षेत्र पंढरपूर येथे काही विकृत बुध्दीच्या व्यक्तींनी सोशल मिडीयावर बाबरी मशिदीचे फोटो अपलोड करुन
सबर जब वक्त हमारा आयेगा तब सर धडसे अलग किया जायेगा ।
असा मेसेज साहिल शेख आणि अरमान शेख यांनी इन्ट्राग्राम स्टोरीला टाकला होता.यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या कृत्याला प्रशासन जबाबदार राहील, असे भाजपा पंढरपूरने तक्रारीत म्हटले आहे.