सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंढरपूरच्या आषाढी वारीत एआयच्या मदतीने केले जाणार गर्दीचे व्यवस्थापन

आषाढीच्या वेळी गर्दी कुठे कशी जाऊ शकते? त्या ठिकाणी ते किती वेळ थांबतील? याचा अंदाज एआयच्या मदतीने बांधला जाऊ शकतो.

Sudarshan MH
  • Jan 21 2025 3:11PM
पंढरपूर: पंढरपूरच्या आषाढी वारीत दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. विठु माऊलीच्या भेटीसाठी वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करत भक्कीत तल्लीन झालेले असतात. पंढरपूरमधील आषाढीवारीसह भारतात इतर ४ प्रमुख यात्रा भरत असतात. सरकारकडून गर्दी नियंत्रणासाठी महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. गर्दी नियंत्रणासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे. यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
 
सध्या लाखोंच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी फक्त ड्रोनचा वापर केला जातो. याद्वारे गर्दी व्यवस्थापन केले जातं. काही सामाजिक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक रस्त्यावर उतरुन गर्दी व्यवस्थापन करत असतात. पण आता एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी मोजणे, व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. एआय तंत्रज्ञानासाठी नुकताच शासनाकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर एआय तंत्रज्ञानावर काम सुरू होईल. जर ही प्रक्रिया लवकर झाली तर आषाढी वारीत गर्दी नियंत्रणासाठी एआय पद्धत वापरली जाऊ शकणार आहे.
 
समोर आलेल्या महितीनुसार, आषाढीच्या दिवशी साधारण १५ लाख वारकरी पंढरपुरात असतात. पंढरपूर शहरात प्रामुख्याने चंद्रभागा वाळवंट, नदीच्या पैल तीरावरील भक्ती सागर परिसर, मंदिर परिसर, दर्शन रांग , प्रदक्षिणा मार्ग, शहरातील रस्ते या भागात यातरा काळात भाविकांची मोठी गर्दी जमते. भाविकांच्या सुरक्षेसाठी गर्दीचे नियंत्रण करणे प्रशासनासमोर मोठं आव्हान असतं. यासाठी पोलीस रात्रंदिवस एक करुन पाहारा देत असतात. पण आता पोलिसांच्या मदतीला तंत्रज्ञान धावून येणार आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार