प्रतिनिधी:-पुणे
चाकण- खराबवाडी येथील युनिथर्म इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनी आणि कामगार संघटना यांचा गेल्या १८ महिन्यांपासून रखडेलेला वेतनवाढ करार अखेर पूर्ण करण्यात आला. पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी कामगार प्रतिनिधी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या यशस्वी मध्यस्थी केली.
युनिथर्म इंजिनिअर्स प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या वेतनवाढ करारावरती आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोहिदास गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरीचा कार्यक्रम झाला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक रघुनाथ मोरे, तेजश बीरदवडे, प्रशांतआप्पा पाडेकर, यूनिट अध्यक्ष संतोष केळकर, उपाध्यक्ष संदीप दरवडे, सरचिटणीस सुभाष कोळेकर, संघटक आनंद शिंगणकर, खाजिनदार राहूल वाघमारे, व्यस्थापनाच्या वतीने सी.इ.ओ. मनीष खंडेलवाल, सी एफ ओ. अमितकुमार झा., जनरल मॅनेजर अभिषेक शर्मा, एचआर हेड सुदर्शन सी, एच आर मॅनेजर अमित पवार आदी उपस्थित होते.
अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी प्रास्ताविक केले व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला.
संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे म्हणाले की, गेल्या १८ महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू होती. करार संपन्न झाल्यामुळे कामगारांना आता एकरकमी ८ हजार रुपये हातात मिळणार आहे. संघटनेचे मार्गदर्शक आमदार महेश लांडगे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेमध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळे कायमस्वरुपी असलेल्या कामगारांना लाभ मिळणार आहे.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे…
एकूण ८००० (आठ हजार एक) रुपये प्रत्यक्ष (नेट) पगार वाढ ही पहिल्या वर्षीच १०० टक्के लागू करण्यात येणार आहे. मेडिक्लेम पॉलीशी १ लाख रुपये कंपनीच्या माध्यमातून व जादाची ५ लाख रुपयांची बफर पॉलीसी, मृत्यू साहाय्य योजना, वर्कमेन कॉम्पेन्सेशन पॉलिसी, नव्याने चालू केली जाणार आहे. दिवाळी बोनस: एक महिन्याचा एक ग्रॉस पगार वार्षिक बोनस म्हणून देण्यात येईल व एक भेट वस्तू देण्यात येईल. अपघात झाल्या मुळे रजा झाल्यास हजेरी बक्षीस मिळणार आहे. वार्षिक सहल: सर्व कामगारांसाठी वर्षातून एकदा तीनशे किलोमीटर अंतरापर्यंत ची सहल दोन दिवस व एक रात्र ठरविण्यात आली आहे. बक्षीस योजना : कामगारांच्या मुला मुलींसाठी त्यांची गुणवत्ता पाहून बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १८ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.