आळंदी : संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास श्रीक्षेत्र पंढरपूर ते आळंदी परत पंढरपूर पालखी सोहळ्या करीता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे संस्थानकडे असलेल्या रथाचे वैभव वाढवीत जर्मन सिल्व्हर रथ संस्थानचे वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई , पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते भेट देत भंडीशेगाव येथे देण्यात आला.
या प्रसंगी संत नामदेव महाराजांचे वंशज केशव नामदास, एकनाथ नामदास, निवृत्ती नामदास, मुकुंद नामदास, नामदास कुटुंबीय, पालखी सोहळ्याचे जनक हैबतबाबा आरफळकर यांचे प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर, दिंडी प्रमुख राणू महाराज वासकर, माऊली जळगावकर, गणेश कराडकर , देवीदास ढवळीकर, बाळासाहेब उखळीकर, हरिभाऊ बोराटे आजरेकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर आदींसह दिंडीकरी, फडकरी, वारकरी उपस्थित होते.
दरम्यान सोहळ्यात पहाटे भंडीशेगांव मुक्कामी माऊलींचे वैभवी पादुकांची विधीवत पूजा प्रमुख विश्वस्त सरपंच योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. सोहळ्यातील प्रवासात दिवसभर माऊलींच्या दर्शनास पंचक्रोशीतील तसेच सोहळ्यातील भाविकांनी गर्दी केली.