श्रावण मास निमीत अतिरुद्र महायागाला' दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ
शश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजन
पुणे : श्रावण मास निमीत गणेशपूजन, महासंकल्प, महान्यास, तब्बल ११ प्रकारचे श्री गणेश, श्री महादेव अभिषक, गणेश लक्ष अर्चना यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी व अकरा दिवसीय अतिरुद्र महायागाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला. जगाच्या कल्याणाकरीता आणि आरोग्यसंपन्न समाजाकरीता १२५ ब्रह्मवृंद सहभागी होत, हा याग करीत आहेत. मंगळवार, दिनांक ९ आॅगस्टपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे अतिरुद्र याग मंदिरात करण्यात येत आहे. वेदमूर्ती नटराजशास्त्री आणि ब्रह्मवृंद होम, विधी करीत आहेत. महान्यास, मंत्रघोष, रुद्र जप, रुद्र होम, गणेश याग, सूर्य याग, विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत केले जात आहेत. मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम करण्यात येत आहेत.
मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे आरोग्यसंपन्न समाजाकरीता प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातील अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू आहे. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे. तसेच २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे. तरी भाविकांनी मंदिरात अतिरुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प