सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महराष्ट्र राज्यात रा. स्व. संघाच्या माध्यमातून योजनापूर्वक भटक्या समाजात सेवा कार्याची सुरवात...

देशभरातील आखणी करून सेवाकार्ये झाले सुरू.

Deepak Chavhan
  • Sep 13 2022 10:59AM
पुणे:- महाराष्ट्राच्या धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील यमगरवाडी येथील शाळा व वसतीगृह गेली जवळपास 30 वर्षांपासून सुरू आहे. पारधी- नंदीबैलवाले - मसणजोगी- कोल्हाटी अशा समाजातील दोन पिढ्या या प्रकल्पामुळे औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. ज्यांना आतापर्यंत या देशाचे नागरिक म्हणून ओळख नव्हती त्यांना भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषदेच्या प्रयत्नांमुळे  रेशनकार्ड, आधार कार्ड, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ लागल्या.


त्याच बरोबर या समाजातील कुटुंबांना कोणताही स्थिर - खात्रीचा व्यवसाय नसल्याने आज ही या कुटुंबांची परवड होत आहे. जमेल तो हंगामी (seasonal) व्यवसाय करून आज ही या समाजाला आपले पोट भरावे लागते आहे.सेवावर्धिनी गेली 4 वर्षे या समाजाच्या उपजीविकेच्या विषयावर काम करत आहे. विशेषतः सोलापूर व धाराशीव या जिल्ह्यातील विविध भटक्या व विमुक्त समाजातील कुटुंबांना बचत गटांच्या माध्यमातून संघटित करणे, त्यांच्या मागणीप्रमाणे रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे, व्यवसाय उभा करण्यासाठी आवश्यक "उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP)", अनुभवासाठी योग्य ठिकाणी  जोडून देणे, मार्केटिंग ची जोड..असं सेवावर्धिनी च्या भटके विमुक्त समाज सशक्तीकरण प्रकल्पाचं"* स्वरूप आहे. या प्रकल्पाअंतर्गत 20 हून अधिक समाजातील 500+ कुटुंबांचा संपर्क,  बचत गट, शिलाई - शेळी- अगरबत्ती बनविणे इ प्रशिक्षण या बरोबरच 100+ पारधी परिवाराना देवलापार जि नागपूर येथे देशी गाय सांभाळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

 या कुटुंबांची शेती आहे पण देशी गाय नसल्यामुळे दूध + पंचगव्याचा परिचय नाही.. शेण- गोमूत्राच्या माध्यमातून शेती विषमुक्त करता येते हे माहिती नव्हते. देवलापार येथील प्रशिक्षणामुळे या पारधी कुटुंबांना याचा परिचय झाला.. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला ..खत व कीडनाशक तयार करण्या बरोबरच धूप, अगरबत्ती, साबण, उटणे बनविणे ही ते शिकले आणि त्याप्रमाणे वस्तू तयार करून जवळपास विक्री ही केली. 
त्यांच्याकडे गाय नसल्याने हे काम पुढे चालविण्यात त्यांना अडचण येत होती. हे लक्षात घेऊन सेवावर्धिनी ने देणगीदाराना आवाहन केले आणि आतापर्यंत 22 पारधी कुटुंबांना देशी गायी देण्यात आल्या. 

आजच साडे ता. करमाळा जि सोलापूर येथील 6 पारधी परिवाराना लाल कंधारी जातीच्या गायी देण्याचा कार्यक्रम पार पडला. पुण्यातील उद्योजक श्री प्रकाशजी धोका,बुलडाणा अर्बन को- ऑप सोसायटी,वैयक्तिक देणगीदार यांनी दिलेल्या अर्थसहाय्यातून या 22 कुटुंबांना गायी दिल्या आहेत.यापुढे ही भटक्या विमुक्त सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत या समाजातील कुटुंबांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा सेवावर्धिनीचा प्रयत्न आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार