शिरूर: शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील ‘सेंट चावरा स्कूल’ आणि रामलिंग येथील ‘सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल’ येथे नागरिकांच्या तक्रारीवरून आम्ही जाऊन पहाणी केली असता, तेथे ख्रिस्ती धर्माचे प्रतीक क्रॉस आणि येशू ख्रिस्त, तसेच मदर मेरी अन् इतर सांकेतिक चिन्हे, तसेच मूर्ती, मंदिरे निदर्शनास आल्या आहेत. या शाळांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक हिंदू विद्यार्थी शिकत असतांना कोणत्याही एका धर्माचे प्रतीक विद्यार्थ्यांच्या सतत निदर्शनास येतील, अशा पद्धतीने जागोजागी लावून जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याची घटना घडत आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार कुठल्याही शाळेमध्ये इतर छायाचित्रे निदर्शनास आलेली नाहीत. त्यामुळे या शाळांची येत्या ८ दिवसांच्या आत समक्ष स्थळ पहाणी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिरूरचे शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे निवेदनाद्वारे शिरूर मधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिली.