बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी तळोदा येथे मूक मोर्चा व प्रशासनाला निवेदन
तळोदा : भारतीय हिंदू समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करून बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या धार्मिक अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांवर लक्ष घालण्याची मागणी केली. याबाबत तळोदा येथील दत्त मंदिरापासून ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा परिसरा पावेतो मुक मोर्चा काढण्यात आला.
तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात हिंदू मंदिरांवरील हल्ले, महिलांवरील अत्याचार, तसेच इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख आहे. यामुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय असुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
हिंदू मंदिरांचे संरक्षण सुनिश्चित करणे.
चिन्मय कृष्ण महाराज यांची तात्काळ सुटका.
हिंदू महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न.
धार्मिक उत्पीडनाविरोधात कठोर भूमिका घेणे.
अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तर मोर्चे करांनी एक रहेंगे शेफ रहेंगे बांगलादेशी हिंदू पर अत्याचार बंद करेंगे हिंदू के हत्यारे बांगलादेश के आतंकवादी अशा पद्धतीचे फलक झळकवले या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.