सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पाचोऱ्यात सकलहिंदू समुदायाचे प्रशासनाला निवेदन

बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून या देशात अल्पसंख्यांक हिंदूच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जिविताचे हनन होत आहे. हिंदू मंदिरांची तोडफोड, जाळपोळ, नासधूस केली जात आहे. हिंदु अबाल ,वृध्द आणि महिलांवर कट्टरधर्मियां कडून सामुहिक अमानवीय अत्याचार वाढत आहे .

Rohit Patil
  • Dec 10 2024 6:00PM

भारत सरकारने बांगला देशातील अल्पसंख्यांक हिंदुंच्या रक्षणासाठी   पावले उचलावी
पाचोऱ्यात सकलहिंदू समुदायाचे प्रशासनाला निवेदन

बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर  गेल्या काही महिन्यांपासून या देशात अल्पसंख्यांक हिंदूच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जिविताचे  हनन होत आहे.  हिंदू मंदिरांची तोडफोड, जाळपोळ, नासधूस केली जात आहे. हिंदु अबाल ,वृध्द आणि महिलांवर  कट्टरधर्मियां कडून सामुहिक अमानवीय अत्याचार वाढत आहे .  बांगला देशातील अल्पसंख्यांक हिंदुंच्या रक्षणासाठी भारत सरकारने जागतिक स्तरावरून पावले उचलून कठोर कार्यवाहीची मागणी करावी. अमानवीय अत्याचारांमुळे बागला देशातील हिंदू समूदाय त्रस्त आणि व्यथीत आहे . जगभरातील हिंदू समुदायाने याची दखल घेतली आहे. बांगलादेशात सूरू  असलेल्या धार्मिक अत्याचारामुळे हिंदूचे आणि विभिन्न धर्मियांचे स्वातंत्र्य सहजीवन धोक्यात असून बांगलादेश शासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्कॉन च्या  चिन्मयकृष्ण महाराज यांना देशद्रोहाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून हिंसात्मक पध्दतीने केलेली अटक निंदनीय आणि अशोभनीय आहे. त्यांच्या अटकेनंतर बांगला देशातील हिंदू समाजाने लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पध्दतीने चिरडण्यात आले. अटकेत असलेल्या चिन्मयकृष्ण महाराजांना कारागृहात शाकाहारी भोजन आणि योग्य औषधोपचार दिले जात नाही. त्यांना कारागृहात  कट्‌टर मुस्लिम दहशतवादी   संघटनांशी संबंधित अतिरेक्यांसोबत ठेवल्याने त्यांच्या जीवितास धोका आहे.    हिंदूंचे धार्मिकस्थळ आणि मंदिरांचे संरक्षण,  हिंदू धर्माचार्य इस्कॉनचे चिन्मयकृष्ण महाराज सह अन्य हिदू धर्माचार्य यांची सुटका, हिंदु महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध ,समाज माध्यमातून बांगला देशातील हिंदू मुली व महिलांवर  अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानवाधिकारांचे हनन थांबविण्यात यावे अश्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
महिला सह सकल हिन्दू समाजातील अनेकांची उपस्थिती होती.      

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार