नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवलेना लाच स्वीकारताना अटक
नांदगाव तालुक्यातील सरकारी कार्यालयात पैसे विना कामे नाहीत काय करायचे करा?
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समिती मधील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वय वर्ष 46 यांना लाजलोचपत प्रतिबंधक विभागाने आठ हजार रुपये लाच स्वीकारताना रंग हात पकडले. ही कारवाई दिनांक दहा डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी करण्यात आली.
तक्रारदार वय वर्ष 46 यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी करणार असलेल्या नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तपासणी अहवालामध्ये सवलत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या निलंबित कर्मचारी प्रशांत जामदडे यांच्या चौकशी प्रकरणात मदत करण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. अशाप्रकारे एकूण आठ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या प्रमोद नवले यांना पैसे स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापाळा रचुन अटक केली. नवले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा, रजिस्टर नंबर 550 दाखल करण्यात आला व जेरबंद करण्यात आले आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे , वालावलकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक एकनाथ ग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडले. पथकात पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस हवालदार योगेश साळवे यांचा समावेश होता.